Horoscope 29 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये यश मिळेल. तुमची वागणूक अत्यंत सौम्य असणार आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी एखाद्याच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आपली बुद्धिमत्ता आणि चतुराई सादर करुन आपली कार्ये सहजपणे पूर्ण कराल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. बोललेली गोष्ट जिव्हारी लागेल त्यामुळे ती मनावर न घेणं हिताचं आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी मेहनत आणि भाग्य याचा खूप चांगला मेळ बसेल. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करा. दिवसाची सुरूवात चांगली होईल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे ओळख मिळेल. मोठ्या कंपनीत काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी टार्गेटवर लक्ष ठेवा. तुम्हाला तुमच्यातील हुशारी दाखवून देण्याची संधी मिळेल. तुम्ही मेहनतीने काम कराल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी उत्साहाने व्यवसातील काम पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. मनात पैशांबाबत अनेक विचार येतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुमची मेहनत आणि नशीब प्रत्येक प्रकारे चांगले प्राप्त होईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी जर कोर्टाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे.नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )