Kalava Astro Tips: सनातन धर्मात लाल रंगाचा अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, कोणत्याही शुभ किंवा शुभ कार्याच्या वेळी हे रक्षासूत्र पूजेला बसलेल्या लोकांच्या मनगटावर बांधण्यात येतं. पण तुम्हाला माहित आहे का की, हातावर कलावा बांधण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
शास्त्रानुसार, हे एक संरक्षणात्मक कवच आहे. जे काही व्यक्तींना नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवण्यास आहे. यासोबत लाल रंगाचा कलवा बांधल्याने व्यक्तीवर देवी-देवतांची कृपा राहते, असंही मानण्यात येतंय.
ज्योतिषशास्त्रानुसार, कलव्याला रंगानुसार वेगळं महत्त्व देण्यात आलं आहे. मुख्यतः लाल, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा कलावा पूजेत वापरला जातो. कलव्यासोबत मंगल दोषही दूर करता येतो. लाल कलावा ज्योतिषानुसार, काही राशीच्या लोकांसाठी ते फायदेशीर मानला जातो. मात्र यावेळी काही व्यक्तींसाठी कलावा हाती बांधणं हानिकारक ठरू शकतं. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, काही लोकांनी हातात कलावा बांधल्याने त्यांचा उत्तम फायदे मिळतात. यामध्ये मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाल कलावा बांधणं शुभ मानले जातं. लाल कळावा बांधल्याने या राशीच्या लोकांना सूर्य आणि मंगळाची विशेष कृपा प्राप्त होतं. तसंच त्यांच्या आयुष्यात अडचणींची संख्या कमी होते, असंही मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांनी लाल कलावा बांधू नये. मुळात शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानला जातो. याच कारणाने शनी देवांना लाल रंग आवडत नाही. अशा परिस्थितीत शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ अर्पण केले जातात. त्यामुळे साधारणपणे मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल रंगाचा कलावा वापरू नये. अशात जर मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल कलावा बांधला तर शनिदेव नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी शक्यतो हातात हा धागा बांधू नये.
लाल रंगाचा कलवा बांधल्याने लोकांवर बजरंगबलीची कृपा सदैव राहते, ज्यामुळे व्यक्तीची सर्व कामं पूर्ण होतात. याशिवाय लाल रंगाचा कलव बांधल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव भक्तांवर असते. जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल तर त्याने लाल रंगाचा कलव पंडित बांधावा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )