Parivartini Ekadashi 2023 : आज परिवर्तिनी एकादशीला 5 दुर्लभ योग! जाणून घ्या महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त

Parivartini Ekadashi 2023 :  आजची परिवर्तिनी एकादशी खूप खास आहे. अनेक शुभ योग तयार होत आहेत. जाणून घेऊया शुभ मुहूर्त, उपाय आणि योग.

नेहा चौधरी | Updated: Sep 25, 2023, 05:15 AM IST
Parivartini Ekadashi 2023 : आज परिवर्तिनी एकादशीला 5 दुर्लभ योग! जाणून घ्या महत्त्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त title=
parivartini ekadashi 2023 date auspicious yoga lord vishnu puja time parana time rituals and significance

Parivartini Ekadashi 2023 : भाद्रपदाची परिवर्तिनी एकादशी आज काही ठिकाणी या एकादशीला डोल ग्यारस, पद्मा एकादशी आणि जलझूलनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू झोपेत आपली बाजू बदलतात, असं म्हणतात. या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. 

यावर्षी परिवर्तिनी एकादशीला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व द्विगुणित झालाय. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्ताला अनेक लाभ मिळू शकतात. परिवर्तिनी एकादशीचा शुभ संयोग, शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या. 

परिवर्तिनी एकादशी 2023 मुहूर्त

भाद्रपद शुक्ल परिवर्तिनी एकादशी तिथी  25 सप्टेंबर 2023 ला सकाळी 07:55 वाजेपासून सुरु होणार असून 26 सप्टेंबर 2023 ला सकाळी 05 वाजेपर्यंत असणार आहे. 

भगवान विष्णूच्या पूजेची वेळ - सकाळी 09.12 ते सकाळी 10.42 वाजेपर्यंत 
परिवर्तिनी एकादशीचा उपवास वेळ - दुपारी 01.25 - दुपारी 03.49 
राहुकाल – सकाळी 07.41 ते सकाळी 09.12 वाजेपर्यंत 

परिवर्तिनी एकादशी 2023 शुभ योग

परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी उत्तराषाढ आणि श्रवण नक्षत्र आहे. दोन्ही नक्षत्रे अतिशय शुभ मानले जाते. या नक्षत्रात केलेली कामं ही पुण्य कर्मे फलदायी ठरतं. यासोबतच परिवर्तनिनी एकादशीला रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सुकर्म योग आहे. 

सुकर्म योग - 25 सप्टेंबर 2023 दुपारी 03:23 - 26 सप्टेंबर 2023, सकाळी 11:46 वाजेपर्यंत
सर्वार्थ सिद्धी योग - 25 सप्टेंबर 2023, सकाळी 11.55 - 26 सप्टेंबर 2023, सकाळी 06.11 वाजेपर्यंत
रवि योग - सकाळी 06:11 - सकाळी 11:55 वाजेपर्यंत 
उत्तराषाद नक्षत्र
श्रावण नक्षत्र

परिवर्तिनी एकादशी पूजा विधी

या एकादशीला श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करा. यानंतर पंचामृताने विष्णूंचा अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पानं, ऋतुकालोद्भव फुलं, फळं अर्पण करा. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. 

परिवर्तनिनी एकादशीला 'या' गोष्टी करा 

जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल तर परिवर्तन एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशरमिश्रित दुधाने अभिषेक करा. त्यानंतर त्यांना पिवळी मिठाई अर्पण करा. असं म्हणतात की हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

या दिवशी गौमातेची सेवा केल्याने 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. एकादशीला गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने तुम्हाला आशिर्वाद प्राप्त होतो. 

परिवर्तनिनी एकादशी उपवास सोडण्याची वेळ 

पंचांगानुसार, 26 सप्टेंबरला दुपारी 01:25 ते 03:49 या वेळेत पार्श्वपरिवर्तनिनी एकादशीचा उपवास सोडता येणार आहे. तर गौण पार्श्व एकादशीचे व्रत 27 सप्टेंबरला सकाळी 06.11 ते 08.30 या वेळेत सोडलं जाणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)