Budhaditya-Bhadra Rajyog : भद्र-बुधादित्य राजयोग करणार मालामाल, 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

Budhaditya-Bhadra Rajyog : बुध ग्रह सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात भद्र राजयोग तयार होईल. यावेळी सूर्य कन्या राशीत अगोदरपासूनच आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 24, 2023, 02:09 PM IST
Budhaditya-Bhadra Rajyog : भद्र-बुधादित्य राजयोग करणार मालामाल, 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ title=

Budhaditya-Bhadra Rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठरलेल्या वेळेत ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, विवेक यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. बुध सूर्य आणि शुक्र यांच्याशी अनुकूल आहे.  ज्योतिष्य शास्त्रानुसार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 

बुध ग्रह सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात भद्र राजयोग तयार होईल. यावेळी सूर्य कन्या राशीत अगोदरपासूनच आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान यावेळी भद्र आणि बुधादित्य राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

हे दोन्ही राजयोग या लोकांसाठी शुभ ठरू शकतात. व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला नवीन ऑफर, प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. मान-प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. नवीन योजनांमध्ये यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.

वृश्चिक रास

हे दोन्ही राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे, जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील, नवीन करार निश्चित होऊ शकतो.

सिंह रास

बुधादित्य आणि भद्रा राजयोगाचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकतं. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि अडकलेला पैसाही परत मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होणार आहे. या काळात नवीन करार होऊ शकतो. करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. नवीन व्यवसाय योजनेसाठी वेळ योग्य आहे. 

कन्या रास

बुधादित्य आणि भद्र राजयोगामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येतील. जमिनीसंबंधी कामातून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला सर्व क्षेत्रात यश मिळेल. मार्केटिंग किंवा विक्रीशी संबंधित लोकांना डील करण्यात यश मिळेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. नवीन व्यवसाय आणि गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)