Nag Panchami 2021 : नागपंचमीच्या पूजेचा शुभमुहूर्त, अशी करा पूजा

नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने होतील अनेक लाभ

Updated: Aug 13, 2021, 08:20 AM IST
Nag Panchami 2021 : नागपंचमीच्या पूजेचा शुभमुहूर्त, अशी करा पूजा  title=

मुंबई : शुक्रवारी 13 ऑगस्ट 2021 रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी. श्रावणातील पंचमी तिथीवर नागपंचमी साजरी केली जाते. श्रावण हा शिवशंकराचा महिना समजला जातो. श्रावणाला सुरूवात झाल्यानंतर सोमवारी शंकराची पूजा केली जाते. आजच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. जाणून घ्या आजच्या पूजेचं महत्व आणि शुभमुहूर्त 

नागपंचमीची पंचमी तिथी ही दुपारी 1 वाजून 42 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. यावेळी दिवसाच हस्त नक्षत्र संध्याकाळी 7.58 पर्यंत आणि साध्य योग संध्याकाळी 6 वाजून 48 पर्यंत असणार आहे. हे दोन्ही योग खूप फलदायी आहेत. 

शिवशंकराच्या गळात नागदेवतेला स्थान आहे. तसेच भगवान विष्णू देखील शेषनागावर विश्राम करतात. नागदेवाला पाताळ लोकमधील स्वामी मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपा राहते आणि त्यामुळे आपलं घरही सुरक्षित राहतं. नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसप्र योगातून मुक्ती मिळते. 

अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचा दूध आणि लाह्या अर्पण केल्या जातात. आजच्या दिवशी नागदेवतेचं दर्शन होणं खूप शुभ मानलं जातं. पौराणिकात आजच्या दिवसाबाबत अनेक आख्यायिका आहेत.