Laxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?

Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2023, 12:52 PM IST
Laxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत? title=
mercury venus yuti created lakshmi narayan yoga in kark money will rain on 5 zodiac signs shukra gochar and budh gochar

Budh Shukra Yuti 2023 in kark : जुलैच्या पहिलाच विकेंड ग्रह गोचरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे.  येत्या शुक्रवारी 7 जुलैला शुक्र गोचर (Shukra gochar) होणार आहे. तर शनिवारी 8 जुलैला बुध गोचर (budh gochar) करणार आहे. शुक्र आणि बुध गोचरमुळे या दोन ग्रहांचं मिलन (Budh Shukra Yuti 2023)होणार आहे. या संयोगाने अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी नारायण योग हा सर्वात शक्तिशाली योगांपैकी एक आहे. या योगामुळे अचानक धनसंपदा, कीर्ती, यश प्रात्त होतं.  (mercury venus yuti created lakshmi narayan yoga in kark money will rain on 5 zodiac signs shukra gochar and budh gochar)

कर्क राशीत हा योग जुळून आला आहे. त्यामुळे या लक्ष्मी नारायण योगाचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि तर्काचा कारक आहे. तर शुक्र हा विलास, सौंदर्य आणि कीर्तीचा कारक आहे. यामुळे जेव्हा या दोन ग्रहाचं मिलन होतं तेव्हा हा शुभ योग जुळून येतो. या योगामुळे कोणाचं नशिबात राजाचं जीवन येणार आहे, चला जाणून घेऊयात. 

तूळ (Libra)

लक्ष्मी नारायण राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांचं आयुष्यात पैसाच पैसा लाभणार आहे. करिअरच्या आलेख चढता राहणार असून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. नवीन ओळखीतून भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग भाग्यशाली ठरणार आहे. अचानक तुम्हाला चोहूबाजूने पैसा मिळणार आहे. आर्थिक व्यवहारात तुमचा फायदा होणार आहे. व्यावसायिकांसाठीही काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. या लोकांना यश, संपत्ती आणि प्रसिद्धी या योगामुळे लाभणार आहे. 

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग आर्थिक फायदा घेऊन आला आहे. मालमत्ता किंवा नवीन गाडी घेण्याचा सुंदर योग तयार झाला आहे. भौतिक सुखासाठी वस्तूची खरेदी करणार आहात. घरात लक्ष्मीचा वास असल्याने सगळे आनंदी असणार आहेत. कार्यक्षेत्रातही प्रगती होणार आहे. तुमचं मनं प्रसन्न असणार आहे. 

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग शुभ ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग गवसणार आहे. नव्या जुन्या गुंतवणुकीतून जास्त फायदा होणार आहे. मुलांच्या बाबातीत आनंदाची बातमी मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योगामुळे नशिब पालटणारा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार असून गूड न्यूज मिळणार आहे. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होणार आहे. विवाह इच्छुक लोकांचे लग्न ठरणार आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)