Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2023, 10:45 AM IST
Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का? title=
shani vakri these zodiac signs get good news Astrology in marathi

Shani Vakri in kumbh 2023 : शनिदेवाचा नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनी देव हा कर्माचा न्यायाधीश आहे. तो जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. तुम्ही चांगलं काम केलं असेल तर चांगल आणि वाईट काम केल्यास तु्म्हाला शनीदेव शिक्षा देतो असं म्हणतात. शनी हा 9 ग्रहांमधील सर्वात संथ ग्रह आहे. त्या एका राशीतून दुसऱ्या राशीत अतिशय संथ गतीने संक्रमण करतो. 4 नोव्हेंबर दुपारी 12.30 वाजता शनी वक्री स्थिती येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम 12 ही राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो अशुभ ठरणार आहे तर काही राशींचा आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे. (shani vakri these zodiac signs get good news Astrology in marathi )

मेष (Aries)

या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात यशाची कठोर मेहनत करावी लागणार आहे. पण जे लोक नवीन नोकरी किंवा पहिल्या नोकरीच्या शोधतात आहे. त्यांना लवकरच ऑफर लेटर मिळणार आहे. शनीदेव या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असणार आहे. शनी वक्रीमुळे या राशीच्या लोकांना चांगला योग आहे. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी शनी वक्री करियरमध्ये अनेक सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. तुमच्या कुठल्याही योजना या दीर्घकाळ यश देणार आहेत. नवीन प्रकल्पासाठी हा काळ योग्य ठरणार आहे. मात्र या काळात कामं मोठ्या गतीने करावी लागले. त्यात कुठलीही दिरंगाई चालणार नाही, अन्यथा मोठं नुकसान होईल. 

 

हेसुद्धा वाचा -  Shani Vakri 2023 : शनीच्या उलट्या चालीमुळे 5 राशींवर साडेसाती; आव्हानात्मक काळाला होईल सुरुवात

 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीसाठीही शनी वक्री काळात नशिबावर गोष्टी सोडून नका. त्यांना करिअरमध्ये बदलासाठी जी नोकरी मिळेल ती करायला हवी. त्यांना चांगली नोकरीसोबत चांगली संधी नक्की मिळेल. यादिवसात स्वभाव शांत आणि मनावर संयम ठेवल्यास कामं छान होतील. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. जर तुम्हाला कोणी तुमच्या चुका दाखवत असेल तर नाराज न होता आपल्या चुका दुरुस्त करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. 

हेसुद्धा वाचा - Shukra Asta 2023 : धनाचा कारक शुक्र होणार 30 दिवसांमध्ये अस्त, 3 राशीच्या नशिबात धनहानी

 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )