मेष- कोणताही निर्णय शांत व संयमीपणे घ्या. नोकरदारांना चाकोरीबाहेरच्या कामात यश मिळेल. मेहनतीचे चीज होईल.
वृषभ- तुमचा एखादा विचार किंवा निर्णयाने इतरांना प्रभावित कराल. ऑफिसमध्ये काही अडचणी उद्भवण्याची शक्यता. मात्र, एखादे अडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता. तुमचा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. मित्रांकडून मदत होईल.
मिथुन- दैनंदिन कामांसाठी अधिक वेळ खर्ची पडेल. जबाबदारीचे भान ठेवून काम करा. धैर्याने आणि शांत मनाने काम केल्यास यश निश्चित मिळेल.
कर्क- उत्पन्नाचे दुसरे साधन गवसल्यामुळे पैशांची आवक वाढण्याची शक्यता. जुने वाद संपुष्टात येतील. इतरांचा दृष्टीकोन समजवून घेण्याचा प्रयत्न करा.
सिंह- नोकरी आणि धंद्यातील लोकांना विशिष्ट ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची गरज. जीवनात एखादा अपेक्षित बदल घडून येईल. परिणामी अनेक गोष्टींचा बारकाईने विचार कराल.
कन्या- आजचा दिवस चांगला राहील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्र-मैत्रिणींसोबत अधिक वेळ घालवाल. त्यांच्याकडून मदत होण्याची शक्यता.
तूळ- परिस्थिती बदलण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज. धैर्य आणि शहाणपणाने काम केल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळवाल. एखादे प्रलंबित असलेले काम मार्गी लागण्याची शक्यता.
वृश्चिक- एखादे काम सहजपणे पूर्ण केल्याने लोकांवर प्रभाव पाडता येईल. एखादी अडचण दूर होण्यासंबंधीचा मार्ग दृष्टीपथात येईल. कामकाजात यश मिळण्याची शक्यता.
धनु- प्रगतीची संधी मिळेल. शांतपणे आणि सामंजस्याने वाटचाल करा. कुटुंबीयांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. एखादी नवीन वस्तू खरेदी कराल.
मकर- एखादे काम पूर्ण केल्याने इतरांच्या मनात स्थान मिळवाल. कमी मेहनत करूनही चांगले यश मिळेल. आप्तेष्ट आणि मित्र परिवाराकडून सहाय्य मिळण्याची शक्यता. वास्तू खरेदीचा योग संभवतो.
कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता. एकाग्रचित्ताने काम करा. एखाद्या व्यक्तीजवळ मन मोकळे कराल. प्रेमसंबंध आणखी दृढ होतील.
मीन- आजचा दिवस प्रचंड उर्जादायी ठरेल. या उर्जेचा योग्य वापर करा. महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी झाल्याने यश पदरात पडण्याची शक्यता.