Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय

Mangal Ast 2023 Effects : कल्याणकारी मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत 24 सप्टेंबरला प्रवेश करत आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ' होणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Sep 24, 2023, 10:48 AM IST
Mangal Ast 2023 : मंगळ शत्रू बुधाच्या कन्यात राशीत अस्त! 4 राशीच्या लोकांचं आयुष्य 'अमंगळ', करा 'हे' उपाय  title=
mangal ast 2023 mars combust in virgo difficulty of the these 4 zodiac signs financial loss

Mangal Ast 2023 Effects on Zodiac Signs : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा गतिमान ग्रह मानला जातो. साहस आणि पराक्रमाचा कारक 24 सप्टेंबरला संध्याकाळी 06:26 ला शत्रू बुधाच्या (Mars Combust in Virgo) कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळ गोचरमुळे (Mangal Gochar) काही राशींना फायदा होणार आहे तर काही राशींच्या आयुष्यात अमंगळ माजणार आहे. या राशींच्या करिअर आणि व्यापाऱ्यावर अशुभ परिणाम होणार आहे. जोपर्यंत मंगळ दहन अवस्थेत राहील तोपर्यंत या राशींच्या आयुष्यात अशुभ घटना होण्याची भीती आहे. अशावेळी ज्योतिषशास्त्रात मंगळ अस्ताचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊयात कुठल्या आहेत त्या 4 राशी आणि त्यासाठी कुठले उपाय सांगितले आहेत ते...(mangal ast 2023 mars combust in virgo difficulty of the these 4 zodiac signs financial loss)

मेष (Aries Zodiac)

मंगळ ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानात अस्त होणार आहे. या राशींच्या लोकांना गुप्त शत्रूंपासून सावध राहवं लागणार आहे. या काळात तुम्हाला अपघात होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. या लोकांनी लांबचा प्रवास टाळावा. शिवाय गाडी सावधपणे चालवावी. 

उपाय - या काळात सूर्याला अर्घ्य द्यावा आणि सूर्य मंत्रांचा जप करावा. 

वृषभ (Taurus Zodiac)

मंगळाच्या अस्तामुळे तुमची सध्याच्या नोकरीमधील तुमची आवड कमी होणार आहे. पुरेशी पगारवाढ आणि पदोन्नती न मिळाल्याने तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. या काळात तुमचा संयम अनेक वेळा ढासळणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला राग येणार आहे. प्रवासात निष्काळजीपणामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार आहे. मुलांच्या आरोग्याने चिंतेत असणार आहात. 

उपाय - हनुमान चालिसाचा पाठ करा.   

सिंह (Leo Zodiac)

मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या उत्पन्नात घट तर खर्चात वाढ होणार आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आरोग्याच्या समस्या वाढणार आहे. डोळ्यांतील ऍलर्जी संबंधित आजार तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीबद्दल असमाधानी असणार आहात.

उपाय - दररोज 11 वेळा “ॐ भास्कराय नमः” चा जप करा.

मीन (Pisces Zodiac)

हे मंगळ संक्रमण या राशींच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. व्यवसायातील प्रतिस्पर्धी तुमच्या मार्गात अडचणी निर्माण करणार आहेत. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावं लागणार आहे.  तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंद टिकवून शकणार नाही. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणार आहे.

उपाय -  रोज 27 वेळा “ॐ मंगलाय नमः” चा जप करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)