Planet Prediction March 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी आगामी मार्च महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलत आहेत. ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योगही तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ राशी बदलत आहेत. बुध आणि शनिचीही वाढ होताना दिसतेय. मार्च महिन्यात होणारे राशिचक्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध 7 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामध्ये राहु ग्रह आधीच उपस्थित आहे. याशिवाय बुध आणि राहूचा संयोग आहे. शुक्र सुद्धा 7 मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी याठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत सुमारे 30 वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. तसंच सूर्यही कुंभ राशीत आहे.
14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार असून, बुधासोबत युती झाल्यामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. यासोबतच सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. याशिवाय 15 मार्चला बुध मीन राशीत आणि 18 मार्चला शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे.
ग्रहांच्या या बदलाचा राशीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संपूर्ण वर्ष केवळ आनंद घेऊन येऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. मार्च महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिनाही चांगला राहू शकतो. अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनाही अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. तुम्ही तुमच्या मुलांच्या वतीने आनंदी राहाल. आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर तुम्ही सहज मात कराल.
कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. घरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वाद आता संपुष्टात येऊ शकतात. मुलांच्या बाजूने सुरू असलेल्या समस्याही संपुष्टात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. तुमचे बोलणे खूप प्रभावी ठरू शकते. वैवाहिक जीवनासाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. तुम्ही घेतलेला निर्णय आता यशस्वी होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )