मेष: उत्तम काम केल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची वेळोवेळी साथ मिळेल. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कौटुंबिक सुख चांगले राहील. चांगली बातमी कानावर येण्याची शक्यता आहे.
वृषभ: शनिवारी तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी दिवस चांगला असेल. नशीब तुमची साथ देईल. चांगली बातमी मिळेल. मानसिक चढउतार अनुभवायला मिळतील. मात्र, कोणत्याही गोष्टीची फार चिंता करू नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे प्रकरण मार्गी लागेल.
मिथुन: तुमचा दिवस आनंदाने सुरू होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील, पदोन्नतीची चिन्हे आहेत. व्यापाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. आज चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कर्क: तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. वैयक्तिक आणि कौंटुबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल.
सिंह: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि कामाच्या क्षेत्रात नफ्याचे स्थान कायम राहील. शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. पण आरोग्याची काळजी घ्या.
कन्या: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. कोर्टाच्या कामातून आराम मिळेल. कामात चांगलं यश मिळेल. दिवस उत्तम आहे. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
तुळ: पैशांच्या दृष्टीनं दिवस खूप चांगला आहे. जुन्या मित्रांसोबत भेटीगाठी होतील. भाग्य तुमच्यासोबत असेल आणि कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल.
वृश्चिक: व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. कामाच्या ठिकाणी चांगला फायदा होईल. पदोन्नती होऊ शकते. अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो.
धनु: आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल. येणारा काळ चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
मकर: तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल.
कुंभ: तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता.
मीन: तुमचा संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुम्ही कामात चांगले पैसे कमवाल. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील.