तुळशी पूजेने घरी सुख, समृद्धी नांदते... पण पुजेचे हे नियम माहित आहेत का?

घरात लावलेले तुळशीचे रोप सकारात्मक उर्जा संचारते. पण तुळशीच्या रोपाच्या पूजेच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.

Updated: May 13, 2022, 10:10 PM IST
तुळशी पूजेने घरी सुख, समृद्धी नांदते... पण पुजेचे हे नियम माहित आहेत का? title=

मुंबई : हिंदू धर्मात, अनेक झाडे आणि वनस्पती आहेत, ज्यांना आपण देवा समान मान देतो. यापैकी एक तुळशीचे रोप आहे. तुळशीच्या रोपाला पूजेचे स्थान मिळाले आहे. कारण असे मानले जाते की, भगवान विष्णूलाही तुळशी अत्यंत प्रिय आहे. तसेच तुळशीला औषधी गुणधर्मांमुळे देखील मान दिला जातो.  ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात माता लक्ष्मी वास करते. म्हणूनच घराघरात तुळशीची विधीनुसार पूजा केली जाते.

घरात लावलेले तुळशीचे रोप सकारात्मक उर्जा संचारते. पण तुळशीच्या रोपाच्या पूजेच्या वेळी झालेल्या चुकांमुळे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. जाणून घेऊया तुळशीची रोपटी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

तुळशीची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीच्या रोपाला नियमित पाणी अर्पण करणे आणि पूजा करणे शुभ मानले जाते. पण शास्त्रात रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला जल अर्पण करण्यास मनाई आहे. या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावू नये. तसेच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करु नये.

तुळशीची पाने कधीही खराब होत नाहीत किंवा शिळी होत नाहीत, त्यामुळे त्याची पाने फेकून देऊ नयेत. ते अत्यंत पवित्र मानले जाते. उलट ही पाने पूजेतही वापरता येतात.

पूजेला वापरण्यासाठी संध्याकाळी तुळशीची पाने कधीही तोडू नयेत, अशी धार्मिक मान्यता आहे. असे केल्याने व्यक्तीला पाप लागते.

तुळशीजवळ तुपाचा दिवा नियमित लावल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.

तुळशीच्या रोपाबद्दल अशीही मान्यता आहे की, ती दक्षिण दिशेला लावू नये. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचबरोबर घराच्या उत्तरेला किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी येते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)