मेष- एखादं नवं काम मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.
वृषभ- आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
मिथुन- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
कर्क- आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
सिंह - सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
कन्या- कोरोना फोफावतोय, आरोग्याची काळजी घ्याय कारण नसल्यास उन्हात बाहेर पडू नका. आजचा दिवस शुभ आहे.
तुळ- शरीरात कोणत्याही प्रकारचं दुखणं असल्यास चिंता करु नका, दुखणं दूर होणार आहे. आरोग्य जपा, धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.
वृश्चिक- मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्याच निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
मकर- वडिलांच्या संपत्तीतील काही भाग आज तुम्हाला मिळणार आहे. अट्टहास आणि अपेक्षा ठेवू नका, येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा.
कुंभ - नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. आज आपल्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या ठिकाणी भटकंतीचा योग आहे.
मीन- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.