बुध-सूर्याच्या युतीचा महायोग, 3 राशींच्या लोकांना मिळणार मोठा फायदा

कर्क राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.

Updated: Jul 10, 2022, 03:08 PM IST
बुध-सूर्याच्या युतीचा महायोग, 3 राशींच्या लोकांना मिळणार मोठा फायदा title=

मुंबई : जुलै महिन्यात सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य योग तयार होतो. कर्क राशीत हा बुधादित्य योग तयार होईल. 16 जुलै रोजी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल आणि 16 जुलैच्या रात्री उशिरा बुध ग्रह देखील कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

कर्क राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. कर्क राशीत तयार झालेला बुधादित्य योग 3 राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. ह्यााचा कोणत्या राशीवर चांगला परिणाम होणार जाणून घेऊया. 

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी कर्क राशीत सूर्य आणि बुधाचे संक्रमण शुभ परिणाम देईल. या लोकांना करिअरमध्ये प्रगती होईल. प्रमोशन - नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे नवीन नोकरीच्या शोधात होते, त्यांना आता आनंदाची बातमी मिळेल. दुसरीकडे मेहनतीमुळे परीक्षा-मुलाखतीतही यश मिळेल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग अतिशय शुभ असणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. पगार वाढू शकतो. नवीन मार्गाने उत्पन्न मिळू शकते. हा काळ व्यापाऱ्यांना भरपूर नफा देणारा आहे. कामात यश मिळेल. जोडीदाराशी संबंध दृढ होतील.

तुळ : बुध-सूर्य युती तुळ राशीसाठी चांगला योग आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठा फायदा होईल. करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. प्रमोशनचा योग आहे. व्यावसायिकांनाही फायदा होईल. तुम्ही गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. नवीन घर-कार खरेदी करू शकता.