मेष राशीसाठी कसं असेल २०१९ हे नवीन वर्ष ?

पाहा कसं असेल नवीन वर्ष

Updated: Dec 31, 2018, 08:32 PM IST
मेष राशीसाठी कसं असेल २०१९ हे नवीन वर्ष ? title=

मुंबई : नवीन वर्षात मेष राशीसाठी काय नवीन असणार आहे. करिअर, आरोग्य कसं असणार आहे याबाबत जाणून घ्या. 

राशी फळ - मेष राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष सामान्य राहिलं. नवीन गाडी खरेदी करण्याचा योग आहे. शुभ कार्यासाठी खर्च होईल.

करिअर - वर्षाच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये चढ-उतार येऊ शकतात. मेहनत केल्यास काही त्याचं फळ निश्चित मिळेल. पद आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ नाही.

कौटुंबिक जीवन - कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात. घर, संपत्ती यावरुन काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते योग्यरित्या सांभाळा. अंहकार कमी करण्याची गरज आहे. नवीन पार्टनरचा शोध पूर्ण होईल. मार्च-एप्रिलमध्ये विवाहाचा योग आहे.

आर्थिक स्थिती - नवीन वर्षात काही अडचणी येऊ शकतात. पैशांचं योग्य नियोजन करावं लागेल. एप्रिल महिना लाभदायक आहे. धनलाभ काही माध्यमातून होऊ शकतो. शुभ कार्यात पैसे खर्च होतील.

आरोग्य - लीवर, घसा, कान यासंबधित काही समस्या येऊ शकतात. वजन अधिक असेल तर ते कमी करण्याची गरज आहे. वाहन चालवताना सावध राहा.