Holika Dahan 2023 : यंदा होळीवर भद्राची सावली? होळी दहनाच्या वेळी 'हे' नियम लक्षात ठेवा अन्यथा..

 Holika Dahan 2023 : सगळीकडे होळीचे वेध लागले आहे. अशातच यंदा होळीवर भद्राची सावली आहे का आणि काय आहे भद्राची वेळ जाणून घ्या. कारण जर भद्रकाळात होलिका दहन केल्यास अशुभ परिणाम दिसून येतात. 

Updated: Mar 5, 2023, 11:56 PM IST
Holika Dahan 2023 : यंदा होळीवर भद्राची सावली? होळी दहनाच्या वेळी 'हे' नियम लक्षात ठेवा अन्यथा.. title=
Holi 2023 holika dahan bhadra on purnima Bhadrakal date time shubh muhurta in marathi

 Holika Dahan 2023 : रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे... सोमवारी महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या उत्साहात (Holi 2023 ) हा सण साजरा करण्यात येणार आहे. पूर्व भारतात हा रंगांचा सण होलिका दहनाच्या 8 दिवसांपूर्वीच साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. पूर्व भारतात भद्राला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिथे भद्रकाळात होलिका दहन केलं जातं नाही. यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे का? हिंदू पंचागानुसार यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे. (Holi 2023 holika dahan bhadra on purnima Bhadrakal date time shubh muhurta in marathi)

कधी आहे भद्राची सावली?

6 मार्चला संध्याकाळी 6.17 नंतर पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. तर 7 मार्च 2023 मंगळवार 06.09 पर्यंत ही तिथी राहणार आहे. पंचागानुसार 6 मार्चला संध्याकाळी 4.18 पासून भद्रा सुरू होणार आहे. त्यामुळे पूर्व भारतात 6 मार्चला होलिका दहन करण्यात येणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चंद्र चतुर्दशीला सिंह राशीत असणार आहे. याचा अर्थ शास्त्रानुसार चंद्र पृथ्वी लोकात असणार आहे. त्यामुळे पूर्व भारतात भद्राकाळ होळी पेटवणे अशुभ मानले जाते. याच कारणामुळे पूर्व भारतात 7 मार्चला होळी पेटवली जाणार आहे. 

भद्रा काळचा मुहूर्त ? (Bhadrakal Muhurat)

6 मार्च 2023 -  संध्याकाळी 4.18 पासून 7 मार्च 2023 ला पहाटे 06.09 पर्यंत 

 

हेसुद्धा वाचा - Holi 2023 Date : महाराष्ट्रात होळी आणि रंगांची उधळण कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर

 

होलिका दहन नियम (Holika Dahan Rules)

पूर्व भारतात होलिका दहनाचे काही नियम आहेत. तिथला रीतिरीवाजानुसार अशी मान्यता आहे की, एक मुलगा असलेल्या जोडप्याने होलिका दहन करणे अशुभ मानले जाते. याशिवाय नवविवाहित महिलांनी होलिका दहन पाहू नये, असंही शास्त्रात सांगण्यात आलं आहे. होलिका दहनाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)