Guru Asta: वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना अधिक काळजी घेण्याचं आवाहन

Jupiter Combust In Taurus: बृहस्पतिच्या अस्ताचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. याशिवाय अनेक राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 6, 2024, 09:15 AM IST
Guru Asta: वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना अधिक काळजी घेण्याचं आवाहन title=

Jupiter Combust In Taurus: देवांचा गुरू असलेल्या गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक वर्ष लागतो. अशा स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी 12 वर्षे लागतात. अशा स्थितीत, गुरू ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत जातो. गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसणार आहे.

1 मे रोजी गुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 3 मे 2024 रोजी पहाटे 3:21 वाजता अस्त होणार आहे. बृहस्पतिच्या अस्ताचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. याशिवाय अनेक राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया गुरूच्या अस्तामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे

मेष रास (Mesh Zodiac)

गुरूच्या अस्ताचा संमिश्र परिणाम होणार आहे. 3 मे पासून, या राशीच्या लोकांना छोट्या कामांसाठीही जास्त मेहनत करावी लागू शकते. तुमच्या बोलण्याची पूर्ण काळजी घ्या, कारण विचार न करता बोलल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. गुरूच्या अस्ताच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 

वृषभ रास (Vrishabha Zodiac)

गुरुच्या अस्त स्थितीमुळे या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आयुष्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. तुमच्या गुरू आणि वडिलांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश होऊ शकता. आणखी आव्हानांना सामोरे जावे लागेल.

कर्क रास (Kark Zodiac)

गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. छोट्या कामातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मे ते जून या काळात वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. काही मुद्द्यावरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)