Ganesh Chaturthi Ganpati Sthapana Muhurat 2023 : पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील स्वाती नक्षत्र आणि अभिजीत मुहूर्त असताना, माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवली आणि भगवान शंकराने त्यात प्राण अर्पण केला. अशाप्रकारे मंगळवारी गणेशाचा जन्म झाला. यंदाची गणेश चतुर्थी अतिशय खास आहे. कारण यंदा बाप्पाच्या जन्मदिनीच मंगळवारी गणेश चतुर्थी आली आहे. हा दुर्लभ दुग्धशर्करा योग अतिशय शुभ मानला जातो आहे. (ganesh chaturthi 2023 date shubh muhurta yog and significance ganpati bappa sthapana video ) गणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी किंवा पाथर चतुर्थी (Vinayaka chavithi 2023) असेही म्हणतात.
यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून आला आहे. त्याशिवाय गणेश चतुर्थीला अंगारक योगात ही चतुर्थी आल्याने तिला महत्त्व प्राप्त झालं आहे. अशा शुभ दिनी गणेशाची प्राणप्रतिष्ठापनेसाठी मात्र फक्त दोनच मुहूर्त आहेत.
पंचागानुसार चतुर्थी तिथी 18 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी सुरु झाली असून 19 सप्टेंबरला 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असणार आहे. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र असून त्यानंतर विशाखा नक्षत्र सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या योगावर पूजा केल्यास दुप्पट फळ प्राप्त होईल अशी मान्यता आहे.
पहिला मुहूर्त - सकाळी - 9.30 ते 11.00 वाजेपर्यंत
दुसरा मुहूर्त - सकाळी 11.25 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत
पहिला मुहूर्त - सकाळी - 10.00 ते 11.25 वाजेपर्यंत
दुसरा मुहूर्त - दुपारी 12.00 ते 1.20 वाजेपर्यंत
घरच्या घरी पूजा करत असाल तर, ती कशी करायची त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. हे लक्षात ठेवा ऊं गं गणपतये नम: मंत्रोच्चार करत पूजा करावी. बाप्पाच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा ठेवा. आता स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून 3 वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. आता बाप्पावर प्रथम पाणी आणि नंतर पंचामृताचे काही थेंब टाका. आता शुद्ध पाणी शिंपडा. धातूची मूर्ती असल्यास त्याचाही अभिषेक करा. आता दिवाची पूजा करुन दिपप्रज्वलन करा.
आता बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. धूप लावा. आता ऋतुफळ, सुकामेवा, मोदक किंवा इतर मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली आणि कपूर आरती करा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )