झोपताना उशीखाली चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू

वास्तू शास्त्राचं जीवनात खास महत्त्व आहे, अशा काही गोष्ट केल्यास आयुष्यभर पैश्याला मुकाल   

Updated: Mar 2, 2022, 05:10 PM IST
झोपताना उशीखाली चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू title=

मुंबई : वास्तू शास्त्राचं जीवनात खास महत्त्व आहे. वास्तू शास्त्र आयुष्यातील अनेक गोष्टींना प्रभावित करतो. वास्तू शास्त्रानुसार घराची दिशा फार महत्त्वाची असते. शिवाय झोपताना उशीखाली ठेवण्यात आलेल्या काही वस्तू फार धोकादायक ठरतात. अशाचं काही गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे अनेक धोके टळू शकतात. 

उशीखाली चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू

पाण्याची बाटली
वास्तू शास्त्रानुसार झोपताना उशीखाली पाण्याची बाटली ठेवू नका. कारण यामुळे चंद्र ग्रह प्रभावित होतो. ज्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता असते. 

पर्स 
वास्तू शास्त्रानुसार झोपताना उशीखाली पर्स किंवा वॅलेट ठेवायचा नाही. कारण असं केल्यास जीवनात आर्थिक परिस्थितीचा सामना कराला लागण्याची शक्यता असते. 

चप्पल
बहुतेक लोक झोपताना बेडच्या आजूबाजूला बूट आणि चप्पल काढतात. वास्तूनुसार ही स्थिती योग्य नाही. असे केल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.

तेल
वास्तुशास्त्रानुसार तेलाची बाटली डोक्याजवळ ठेवू नये. यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)