मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा फार प्रभावशाली ग्रह मानला दातो. न्यायप्रिय असलेले शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचं योग्य ते फळ देतात. तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्याना शिक्षा देखील करतात. शनिदेवासाठी शनिवार समर्पित असून शनिग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव पाडतो.
शनिदेव हे फार लवकर क्रोधित होतात, असं मानलं जातं. अशात त्यांची कृपादृष्टी टिकवून ठेवण्यासाठी पूजेसह काही गोष्टींचं विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. अशावेळी काही मान्यतांप्रमाणे, शनिवारी काही वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया शनिवारी कोणत्या वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे.
आजच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी टाळली पाहिजे
शनिवारी मोहरीचं तेल शनिदेव आणि पिंपळाच्या झाडावर चढवण्यात येतं. मात्र असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीवर चांगली दृष्टी टाकतात. त्यामुळे शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करू नये.
शनिदेवाला काळा रंग अत्यंत प्रिय आहे. शनिवारी शनिदेवाला काळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केलं जातं. त्यामुळे शनिवारी काळे कपडे किंवा काळ्या रंगाच्या इतर गोष्टी खरेदी करणं टाळावं.
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, शनिवारी गॅस, आगपेटी, रॉकेल अशा प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांची खरेदी करणं टाळावी. हे पदार्थ खरेदी केल्यास घरात क्लेश निर्माण होण्याची शक्यता असते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)