मुंबई : हिंदू धर्मामध्ये 'अतिथि देवो भवः' ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. त्यामुळे घरी आलेला प्रत्येक पाहुणा आपल्यासाठी देवा स्वरूप असतो. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टींचा विचार केला जातो. पाहुणे आल्यानंतर अनेक विषयांवर गप्पा रंगतात. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या पाहुणे आल्यानंतर टाळायला हव्या...
अशा तीन गोष्टी आहेत, ज्या पाहुणे आल्यावर कधीचं विचारू नका, नाहीतर मोठं नुकसान होईल...
शिक्षणाबद्दल प्रश्न
एखादा व्यक्ती पहिल्यांदा आपल्या घरी आल्यानंतर आपल्यात उत्सुकता असते की, त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्याव्या. पण घरी आलेल्या पाहुण्याला कधीही त्याच्या शिक्षणाबद्दल विचारू नकी.
कारण जर त्याचं शिक्षण कमी असेल तर, त्याला सर्वांसमोर सांगण्यासाठी असहजता वाटेल, कदाचित वाईट देखील वाटू शकेल. म्हणून पाहुणे घरी आल्यानंतर कधीही त्याला शिक्षण विचारू नका.
महिन्याचं वेतन
सामान्यतः लोकांना स्वतःपेक्षा इतरांचे उत्पन्न जाणून घ्यायचे असते. हा प्रश्न इतरांना थोडा रास्त आहे, पण ही गोष्ट घरी आलेल्या पाहुण्याला विचारू नये. कारण या प्रश्नाने त्यांना वाईट वाटू शकते.
जात आणि धर्म
विष्णु पुराणानुसार, घरी आलेल्या पाहुण्याला विसरुनही त्याची जात, धर्म विचारू नये. याशिवाय पाहुण्याला त्याचे गोत्रही विचारू नये. पाहुण्याला असे प्रश्न विचारल्याने नाते बिघडू शकते.