Solar Eclipse 2022: या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. कार्तिक अमावास्येला तूळ राशीत सूर्यग्रहण होणार आहे. अमावास्या तिथी 24 आणि 25 ऑक्टोबर अशी दोन दिवस असणार आहे. अमावास्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होईल आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजून 18 मिनिटापर्यंत असेल. भारतात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. भारतात हे ग्रहण पूर्व भाग सोडला तर इतर ठिकाणांहून दिसेल. नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरी या भागात सूर्यग्रहण दिसेल. त्यामुळे सुतक काळ पाळावा लागणार आहे. या ग्रहणाचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल.
भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 29 मिनिटं ते 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच 1 तास 14 मिनिटे असेल. सूर्यास्तानंतर हे ग्रहण संध्याकाळी 05:43 वाजता पूर्ण होईल.
ग्रहणाच्या आधीचा काळ हा अशुभ मानला जातो आणि त्याला सुतक काळ म्हणतात. सुतक काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात कोणत्याही व्यक्तीने नवीन कार्य सुरू करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतरच संपतो. आंशिक सूर्यग्रहणाचे सुतक पहाटे 03 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 05 वाजून 43 मिनिटांनी समाप्त होईल.
वृषभ: ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण चांगले नसेल. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांच्या नोकरी किंवा व्यवसायात बदल होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. आर्थिक नुकसानही होऊ शकते.
कन्या: दिवाळीला होणारे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले नसेल. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांनी यावेळी मोठे निर्णय घेणे टाळावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. खर्चही वाढतील.
Budh Margi 2022: 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत 'या' राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ, आर्थिक स्थिती सुधारणार
तूळ: सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य तूळ राशीत राहणार असल्याने या ग्रहणाचा तूळ राशीच्या लोकांवर सर्वाधिक प्रभाव पडेल. ते पैसे गमावू शकतात. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
वृश्चिक: सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांनाही हानी पोहोचवू शकते. त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाणीवर ताबा न ठेवल्यास नुकसान होऊ शकते. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)