Datta Jayanti 2023: 'या' दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे

Datta Jayanti 2023 : अनेक भाविकांमध्ये संभ्रम आहे की, दत्त जयंती कधी आहे? 25 की 26 डिसेंबर नक्की कुठल्या तारेखला साजरी करायची आहे. जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा विधी, महत्व आणि मान्यता

नेहा चौधरी | Updated: Dec 24, 2023, 10:46 AM IST
Datta Jayanti 2023: 'या' दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे  title=
datta jayanti 2023 date time muhurta puja vidhi and significance and benefits of audumbar pradakshina in marathi

Datta Jayanti 2023 :  महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे ज्याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. दत्त जयंती 25 की 26 डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरा केली जाणार आहे. औदुंबरमध्ये दत्त जयंतीचा उत्सव सोमवारी 25 डिसेंबरपासून साजरी करण्यात येणार आहे. (datta jayanti 2023 date time muhurta puja vidhi and significance and benefits of audumbar pradakshina in marathi)

कधी आहे दत्त जयंती?

पंचांगानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 ला सकाळी 5 वाजून 46 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2023 ला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांपर्यंत आहे. 

दत्त जयंती महत्व आणि मान्यता

भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्रित रूप आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामं पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणं देखील शुभ मानलं जाते. महर्षी अत्री आणि माता सती अनुसूया यांचं पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. माता अनुसूयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचं पुत्र म्हणून जन्म घेतल्याची आख्यायिका आहे. 

दत्त जयंती पूजा

दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र वस्त्र परिधान करा. त्यानंतर त्यावर भगवान दत्तात्रेयांचं फोटो किंवा मूर्तीची स्थापना करा. आता त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा. यानंतर धूप, दिवा, फुलं, नैवेद्य अर्पण करा. पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करणं शुभ मानलं जातं. या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असं मान्यता आहे. यानंतर मंत्रांचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचं पठण करा. 

औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे काय? 

नियमित औदूंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते, अशी मान्यता आहे.

एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होऊन आपलं जीवन समाधानी राहण्यास मदत होते.

औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवण दिल्यास तुम्हाला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ प्राप्त होतं.

औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिहंसरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)