राशिभविष्य : 'या' राशिंचा दिवस चांगला जाईल

तुमचा आजचा दिवस पाहा कसा जाणार?

Updated: Feb 16, 2021, 06:33 AM IST
राशिभविष्य : 'या' राशिंचा दिवस चांगला जाईल title=
संग्रहित छाया

मेष-
आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. आज कामे होतील. तसेच स्वत:ची वेगळी छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. दिवस चांगला जाईल. कुटुंबीयांचे चांगले सहकार्य मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

वृषभ-
आज एकाग्रतेवर भर द्यावा लागेल. मनातील चिंता काढून टाकाव्यात. आजचा दिवस तसा बऱ्यापैकी जाणार आहे. कुटुंबाकडे लक्ष द्यावे.

मिथुन-
आनंदी राहण्यासाठी तुम्ही आधी मनातील शंका दूर कराव्यात. आजचा दिवस साधारण जाईल. व्यवसायात एकादा निर्णय घेताना विचार करावा. त्यामुळे उत्तम व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे.

कर्क-
आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्या. कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नका. परोपकाराची जाणीव ठेवा. तसेच नातेवाईकांना मदत करावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी हाताखालील लोकांची मदत होईल. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल.

सिंह-
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विलंबावर मात करावी. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामाची अचूक दखल घेतली जाईल. बौद्धिक छंद जोपासाल.
कन्या:-अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांची तोंडे बंद होतील मुलांचे साहस वाढेल.

तूळ-
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही. जबाबदारी योग्यप्रकारे हाताळावी. धाडसी शब्द वापराल. अति चिकित्सा करू नका.

वृश्चिक-
आज सावध भूमिका घ्यावी लागेल. कोणाला दुखवू नका. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. खर्चाला लगाम घालावा लागेल. जास्त खर्च भविष्यात त्रासदायक ठरेल.  मित्रांच्या गाठीभेटी होतील.

धनु-
आजचा दिवस छान जाईल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल. हातून चांगले लिखाण होईल. सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. आज तुम्हाला नवीन मित्र भेटण्याची शक्यता आहे.

मकर-
आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या व्यवहारात सावधानता बाळगावी. गूढ गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रवासाची शक्यता आहे.

कुंभ-
आजचा दिवस चांगला जाईल. एकाद्या ठिकाणी स्पष्ट बोलण्यावर भर द्या. एखादी गोष्ट लक्षात घ्याल. त्यादृष्टीने प्रयत्न करा. आपल्या कामात तत्परता दाखवावी. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल.

मीन-
आजचा दिवस उत्तम जाईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. बौद्धिक ताण जाणवेल. त्यामुळे थोडासा थकवा जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ लोकांची काळजी घ्यावी.