आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ८ फेब्रुवारी २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 8, 2019, 08:39 AM IST
आजचे राशिभविष्य | शुक्रवार | ८ फेब्रुवारी २०१९  title=

मेष - आज काही नवीन अनुभव येण्याची शक्यता आहे. काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. स्पष्ट शब्दात स्वत:ची बाजू मांडा. आज प्रत्येक व्यक्ती तसेच काही कामातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ - दिवस चांगला आहे. पैशासंबंधी काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. जुन्या नुकसानीची भरपाई होऊ शकते. भावंडे, मित्र तसेच कामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांकडून मदत मिळेल. 

मिथुन - आज स्वत:ने केलेल्या योजनेवर विश्वास ठेवा. पैशांसंबंधी काही ऑफर्स येऊ शकतात. त्यावर गंभीरतेने विचार करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. महिलांसाठी दिवस शुभ आहे. धनलाभाची शक्यता आहे.

कर्क - नातेसंबंध घट्ट करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कामाकडे तसेच जबाबदारीकडे लक्ष द्या. जवळच्या नातेवाईकांशी संवंध अधिक घट्ट होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यवसायात प्रगती होईल.

सिंह - तुमच्या क्षेत्रात दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्यात अधिक उत्साहित असाल. कामात कितीही व्यस्त असाल तरी घरातील लोकांशी फोनवरून कॉन्टॅक्ट ठेवा. काही महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. 

कन्या - दिवस चांगला आहे. पैशांसंबंधी असणाऱ्या समस्या संपण्याची शक्यता आहे. आज खास व्यक्तीकडून मदत मिळू शकते. अनेक गोष्टी सहजपणे सुटू शकतील. विश्वासातील व्यक्तीशी मनातील गोष्टी शेअर कराल. समस्यांवर सहजपणे मार्ग काढू शकता. कामे वेळेत पूर्ण होतील.

तुळ - एखाद्या खास कामासाठी तुम्ही अतिशय उत्साही रहाल. नवीन अनुभव येतील. व्यवसायात एखादी डील करण्यासाठी दिवस चांगला आहे. स्वत:ची मते इतरांकडे सहजतेने मांडू शकता. अनेक दिवसांपासून विचार करत असलेलं काम आज करू शकता. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

वृश्चिक - नवीन माहिती मिळेल. एकट्याने संपूर्ण कामे करण्याची इच्छा होईल. लोकांना प्रभावित करू शकाल. पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात. संधीची फायदा घेऊ शकता.

धनु - आत्मविश्वास राहील. कोणत्यातरी खास कामासाठी योग्य वेळी उपस्थित राहू शकता. वाद-विवादात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तीमत्त्वाने लोक प्रभावित होतील.

मकर - वेळ मिळाल्यास आराम करा. पैशांसंबंधी स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. साथीदारासाठी गिफ्ट घेऊ शकता. खासगी गोष्टी सोडवण्यात यश मिळेल. लोकांशी बोलाल तर काही नवीन विचार पुढे येऊ शकतात. नवीन कामासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळेल. 

कुंभ - कायदेविषयक गोष्टीत यश मिळेल. काही लोकांशी भेट होऊ शकते. प्रवासाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रशंसा करतील. समाज आणि कुटुंबात सन्मान मिळेल. लोक तुमच्यामुळे खुश होतील.

मीन - तुमचे विचार स्पष्टपणे मांडा. व्यवसायात लोकांना तुमच्या बोलण्याने तुमचे म्हणणे पटू शकते. व्यवसायात यशदायक दिवस आहे. खास व्यक्तीला प्रभावित करू शकाल. अचानक होणारी भेट प्रेमसंबंध सुरू करू शकते. आत्मविश्वास वाढेल.   

-दीपक शुक्ला