मेष - आयुष्याचा मनमुराद आनंद घ्यायचा प्रयत्न कराल. कोणत्याही अनुभवी व्यक्तीकडूनच आर्थिक गुंतवणुकीविषयीचे सल्ले घ्या. पती- पत्नीच्या नात्यात संवाद वाढेल. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होतील.
वृषभ - स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी व्हाल. आज तुमच्या स्वभावाने अनेकांची मनं जिंकाल. अविस्मरणीय घटना तुमचं आयुष्य पालटून जातील.
मिथुन - दिवसभर सकारात्मक उर्जा असेल. व्याव्यावसायिकांना त्यांच्या कामात यश मिळेल. आर्थिक मुद्द्यांवर सहचारीणीशी संवाद साधाल.
कर्क - नवख्या व्यक्तींच्या सल्ल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या सहवासामुळे कुटुंबात आनंद असेल. नव्या योजनांची तूर्तास अंमलबजावणी कराल.
सिंह - नोकरीच्या ठिकाणी असणारी अचूक आणि समर्पक वृत्ती तुम्हाला यश देणार आहे. प्रिय व्यक्ती भेटायला आतूर असतील अशा व्यक्तींना भेटण्याचीही संधी मिळेल.
कन्या - तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. त्यांच्या भावनांचा आदर करा. व्यवसायामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा.
तुळ - गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. योगाभ्यास आणि ध्यानधारणा फायद्याची ठरेल. सकारात्मकतेने गोष्टींकडे पाहा.
वृश्चिक - मानसिक स्थैर्य तुम्हाला चांगल्या आयुष्याच्या दिशेने नेणार आहे. गृहोपयोगी गोष्टींमध्ये तुम्ही अधिक रमाल. गरजेच्या वेळी मित्रांची साथ लाभेल.
धनु - परदेशात मोठ्या गुंतवणुकी करण्यास तुमची इच्छा अधिक होईल. गैरसमज चर्चेने सोडवलात तर, नात्यांमध्ये तणाव येणार नाही.
मकर - अनपेक्षित व्यक्तींशी भेट घेण्याचा योग आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. पती- पत्नीच्या नात्यात असणारे वाद दूर होतील.
कुंभ - आर्थिक व्यवहारांवर लक्ष असूद्या. कोणा एका तिसऱ्याच व्यक्तीवर विश्वास ठेवताना सांभाळून राहा. प्रवासामुळे थोडा थकवा येईल.
मीन - प्रयत्न करणं सोडू नका. याच बळावर तुमची स्वप्न साकार होणार आहेत. महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. वायफळ चर्चा करण्यामध्ये वेळ घालवू नका.