Chaturgrahi Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी संक्रमण करत असतात. यातून शुभ असे योग अगदी कधी कधी राजयोगाची निर्मिती होते. लवकरच धनु राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग, आदित्य मंगल राजयोग, बुधादित्य योग, धन योग यांसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडणार आहे. मात्र 3 राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग वरदान ठरणार आहे. त्यांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (Chaturgrahi yoga in Sagittarius after 5 years Opportunity for these zodiac signs to become wealthy)
चतुर्ग्रही हा योग तुमच्या राशीच्या भाग्यशाली स्थानात निर्माण होणार आहे, त्यामुळे हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रातही लाभ मिळणार आहे. जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात घवघशीत फायदा होणार आहे. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करणार आहात. काम-व्यवसाय संबंधित कारणांसाठी प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.
या राशीच्या पाचव्या भावात चतुर्ग्रही योग निर्माण होणार असल्याने हा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या मुलाची प्रगती होणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला चांगल्या ऑफरमिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगली गती मिळणार आहे. तसंच या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यात यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंद असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. तसंच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळणार आहेत.
चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार असल्याने भौतिक सुखात वाढ होणार आहे. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करणार आहात. तुमच्या सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होणार आहे. समाजात तुमचा सन्मानही वाढणार आहे. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर त्यांच्या करियरमध्ये प्रगतीची शुभ संकेत आहेत. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)