Chanakya Niti: महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात 'या' इच्छा; कधी बोलून दाखवत नाही स्त्रिया

Chanakya Niti : चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रंथामध्ये महिलांबद्दलच्या अनेक खास गोष्टी सांगितल्या आहेत. अशा अनेक गोष्टी असतात, ज्या महिला नेहमी लपवून ठेवतात. 

Updated: Jul 23, 2023, 07:50 PM IST
Chanakya Niti: महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात 'या' इच्छा; कधी बोलून दाखवत नाही स्त्रिया title=

Chanakya Niti : सुखी जीवन जगण्यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. त्यांच्या या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्य यांचे राजकारण, व्यवसाय आणि पैसा याविषयीचे ज्ञान इतके अचूक आहे. त्याचं हे ज्ञान आजच्या युगातही उपयुक्त आहे.

स्त्रियांविषयी सांगितल्यात अनेक गोष्टी

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रंथामध्ये महिलांबद्दलच्या अनेक खास गोष्टी सांगितल्या आहेत. अशा अनेक गोष्टी असतात, ज्या महिला नेहमी लपवून ठेवतात. चाणक्यांनी त्यांच्या धोरणात पुरुषांची स्त्रियांशी तुलना करताना त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. 

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, महिलांची भूक, लज्जा, धैर्य या गोष्टी तसंच त्यांची इच्छा जास्त असतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची इच्छा महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते. 

आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या इच्छांचे वर्णन एका श्लोकाद्वारे केलंय. हा श्लोक म्हणजे- स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥

जाणून घेऊया महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कोणत्या इच्छा जास्त असतात

लज्जा

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथामध्ये सांगितलंय की, स्त्रियांना पुरुषांपेक्षा चौपट जास्त लाज असते. महिलांना पुरुषांपेक्षा अधिक लाज वाटते. यामुळे महिला कधीही काहीही बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात.

भूक

आचार्य चाणक्यांच्या मते, पुरुषांमध्ये महिलांना अधिक प्रमाणात भूक लागते. आचार्य चाणक्याच्या वरील श्लोकानुसार स्त्री शक्तीचे वर्णन केलंय. आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांची भूक पुरुषांपेक्षा दुप्पट असते. 

ध्यैर्य

चाणक्य धोरणानुसार, साहसाच्या बाबतीत महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे आहेत. महिला सुरुवातीपासूनच धैर्यवान असतात. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्य असतं. म्हणूनच स्त्रियांना शक्तीस्वरूप देखील मानलं जातं.

कामवासना

आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांना पुरुषांपेक्षा आठ पटीने जास्त ही इच्छा असते, परंतु त्यांच्यामध्ये त्या सहनशील असल्याने अनेकदा उघडपणे बोलून दाखवत नाहीत.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )