शत्रूवर मात करण्यासाठी भन्नाट चाणक्य नीति; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल

शत्रू कितीही बलशाली असो... 

Updated: Aug 5, 2022, 12:13 PM IST
शत्रूवर मात करण्यासाठी भन्नाट चाणक्य नीति; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल title=
Chanakya Niti For Good Life how to overcome from bad people

Chanakya Niti For Good Life : आयुष्यातील आव्हानं असो, शत्रुद्वारे निर्माण केलेले अडथळे असो किंवा आणखी काही समस्या असो. चाणक्य नीतिमध्ये या साऱ्यावर तोडगा देण्यात आला आहे. आज आपण अशाच एका मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. 

महान कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ आणि अर्थशास्‍त्री आचार्य चाणक्‍य यांनी शत्रुवर मात करण्याचे काही परिणामकारक उपाय सांगितले आहेत. यातला एक उपाय इतका सोपा आहे की फार काहीही न करता तुम्ही शत्रूवर मात करु शकता. 

शत्रू कितीही बलशाली असो, त्याच्यावर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे तुमचं स्मितहास्य 
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये म्हटलंय, शत्रू कितीही शक्तिशाली असला तरीही त्याला एका सोप्या मार्गानं नमवणं सहज शक्य आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. ते म्हणजे हसत राहण्याचं. 

असं केल्यास तुमच्या शत्रूची प्रत्येक चाल निकामी पडताना तुम्ही स्वत: पाहू शकता. तुमचा आनंद शत्रुचं मनोधर्य तिळतिळ तोडून टाकेल. आपल्याकडून निर्माण केले जाणारे अडथळे याच्यावर काहीच परिणाम करत नाहीयेत या भावनेनं शत्रू खचेल. 

तो बैचेन होईल, कालांतरानं आपले सर्व डावपेच निरामी होत असल्याचं पाहून तोच तुमच्यासाठी अडचणी पेरणं बंद करेल. 

तात्पर्य काय ? 
आपले डावपेच यशस्वी होताना समोरच्याला जितका त्रास होईल तितकाच आनंद शत्रूला होत असतो. समोरच्याला दु:खात पाहून त्याला आनंद होतो. त्यामुळं शत्रूचे मनसुबे पायदळी तुडवण्यासाठी तुम्ही आनंदी राहणं कधीही योग्यच ठरेल.