Chanakya Niti:'या' तीन पैकी एक घटना घडणे हे दुर्दैव! जाणून घ्या सांगते चाणक्य नीति

चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Updated: Jul 4, 2022, 01:57 PM IST
Chanakya Niti:'या' तीन पैकी एक घटना घडणे हे दुर्दैव! जाणून घ्या सांगते चाणक्य नीति title=

Chanakya Niti: चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. माणसांनं कसं जगावं? कोणत्या चुका करू नये? याबाबत सांगितलं आहे. सुख आणि दु:ख दोन्ही जीवनाचे महत्त्वाचे पैसू असून चाणक्य नीतिच्या गोष्टी खूप उपयोगी ठरतात. चाणक्य नीतीमध्ये मनुष्याचा आयुष्यात काही गोष्टी घडणं दुर्दैवी असल्याचं सांगितलं आहे. या घटनांमुळे माणसाला आयुष्यात खूप त्रास होतो. चला जाणून घेऊया अशा कोणत्या घटना आहेत.

वृद्धापकाळात साथीदाराचा मृत्यू: पती-पत्नी हे नातं आयुष्यभर टिकतं. लग्नानंतर पुढे आयुष्यभर दोघं एकमेकांचे साथीदार असतात. वृद्धापकाळात जेव्हा पती-पत्नीपैकी एकाचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे उर्वरित आयुष्य जगणे कठीण होते. आयुष्याच्या जोडीदाराशिवाय म्हातारपण जगणे खूप कठीण आहे. यामुळे चांगले आयुष्यही दु:खाने भरून जाते.

तुमचा पैसा चुकीच्या हातात जाणे: सुखी जीवनासाठी पैसा असणे खूप गरजेचे आहे, पण कष्टाने कमवलेला पैसा जेव्हा चुकीच्या हातात जातात. तेव्हा आयुष्यात यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. कारण त्याचा पैसा चुकीच्या व्यक्तीकडे किंवा शत्रूपर्यंत पोहोचला तर तो त्याचा पैसा त्याच्याविरुद्ध देखील वापरू शकतो.

दुसऱ्याच्या घरात राहणे: काही कारणास्तव दुसऱ्याच्या घरी राहावे लागले तर ते मोठे दुर्दैव आहे. दुसऱ्याच्या घरात राहिल्याने माणूस केवळ दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही, तर त्याला त्याच्या इच्छेनुसार जगावे लागते. अशा स्थितीमुळे व्यक्तीचा स्वाभिमानही नष्ट होतो. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात राहणे टाळावे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)