Budh Ast in Mesh Rashi: खगोलीय घडामोडींचं ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व मानलं जातं. 23 एप्रिल 2023 रोजी बुध ग्रह मेष राशीत अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या व्यक्तींना प्रतिकूल परिणामांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह असून सर्वाधिक वेळा अस्ताला जातो.
दरम्यान यामुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागणार आहेत. यावेळी काही राशींच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यामध्ये बुध ग्रहाचा प्रभाव 4 राशींवर जास्तीत जास्त राहणार आहे. एकंदरीत कोणत्या राशींवर बुध ग्रहाचा प्रभाव पडणार आहेत, ते जाणून घेऊया.
बुध ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. या काळामध्ये तुमच्या पार्टनरशी तुमचं नातं तुटू शकतं. याशिवाय कठोर मेहनत करूनही तुम्हाला कामाच्या ठिकाणी वाढ होणार नाही. तसंच प्रगती होण्यास अडचणी येतील. कितीही प्रयत्न केले तरी खर्च कमी होणार नाहीत. तुम्ही स्वतःला एकटे वाटून घ्याल.
बुध ग्रहाचा अस्त या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अडचणी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होणार असून नोकरी जाण्याचीही शक्यता आहे. तुमचं मन या काळामध्ये विचलीत होई शकतं. कुटुंबामध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती मात्र बेताची राहणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी.
बुध ग्रहाच्या अस्तामुळे या राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप मेहनत कराल मात्र त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बेताची राहणार आहे. प्रयत्न करूनही खर्च कमी होणार नाहीत. या काळामध्ये नशीब तुमचं साथ देण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणार नाहीये. तुम्ही प्रवास करत असाल तर त्यामध्ये धनहानी होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या राशीच्या व्यक्तींना बुध अस्तामुळे नोकरी किंवा धंद्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. नवीन कामात रूजू होणार असाल तर विचार पुढे ढकलावा. बिझनेस करणाऱ्या व्यक्तींना कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. हातात पैसा टिकणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ फारसा बरा दिसत नाहीये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)