Black Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा

Black thread Benefits : नजर लागू नये म्हणून हिंदू धर्मात काळा धागा बांधला जातो. नजर लागू नये याशिवाय अनेक फायदे आहे, पण काही राशींच्या लोकांनी चुकूनही काळा धागा बांधू नये. कारण यांना फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं. 

नेहा चौधरी | Updated: Sep 30, 2023, 02:12 PM IST
Black Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा  title=
black thread for Nazar Black thread benefits but these zodiac sign people should not wear black tread

Black thread for Nazar : आपण सेलिब्रिटीपासून सर्व सामान्य लोकांच्या पायाला काळा धागा बांधलेला पाहिला आहे. खास करु मुलींच्या पायाला काळा धागा असतो. खरं तर काळा रंग हा उष्णता शोषून आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करतं. याशिवाय काळा धागा धारण करण्यामागील श्रद्धा काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबत काही राशींसाठी हा काळा धागा फायद्याऐवजी नुकसान ठरतो. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (black thread for Nazar Black thread benefits but these zodiac sign people should not wear black tread)

काळा धागा बांधण्याचे फायदे (Black thread Benefits)

1 पायांवर काळा धागा धारण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो, असं शास्त्रात मानलं गेलं आहे. त्याशिवाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. 

2  पोटाशी संबंधित समस्याही पायात धागा बांधल्यामुळे दूर होतात. बद्धकोष्ठता, लूज मोशन अशा समस्या निर्माण होत नाही. शिवाय तुमची पचनक्रिया सुधारते. 

3 काळा धागा धारण केल्याने यश प्राप्त होतं अशी मान्यता आहे. याशिवाय पोटाला काळा धागा बांधल्याने स्तन आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतं नाही. तसंच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 

4 काळा दोरा बांधल्याने वाईट नजरेपासून संरक्षण होतं. त्यामुळे वाहनांनाही काळा धागा बांधला जातो. 

5 त्याचवेळी असं मानलं जातं की मुख्य गेटवर काळा धागा बांधल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा नांदते.

6 काळा धागा बांधताना 9 गाठी बांधाव्या. हा धागा बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. या उपायाने अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

7 लहान मुलांना काळा धागा नक्की बांधा. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि नकारात्मक ऊर्जेपासून त्यांचं रक्षण होईल. 

8 काळा धागा हा उष्णता शोषून घेतो आणि आपली नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतं. 

'या' राशींनी काळा धागा बांधू नये

मेष

 मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळ ग्रहाला काळ्या रंगाचा राग आहे. अशा स्थितीत मेष राशीच्या व्यक्तीने काळा धागा चुकूनही बांधू नये. या राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधल्यास त्यांच्या आयुष्यात वाईट परिणाम दिसून येतो. 

वृश्चिक

वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ असल्याने मंगळ देवाला काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. यामुळेच या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ आहे. या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास मंगळाचा शुभ प्रभाव संपुष्टात येतो आणि त्याच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येतो.  

'या' राशींसाठी काळा धागा शुभ !

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळा धागा अतिशय शुभ सिद्ध होतो. शनिदेव हा तूळ राशीचा उच्च रास आहे, तर मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. त्यामुळे या लोकांसाठी काळा धागा वरदान सिद्ध होतो. या राशीच्या लोकांनी काळा धागा बांधल्यास आर्थिक स्थिती सुधारते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)