Surya and Budh Gochar 2023 October: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 18 ऑक्टोबर रोजी सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून 01:18 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य राशी बदलाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह राशी बदलणार आहे. बुध कन्या राशी सोडून दुपारी 01:06 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे एका राशीवर उत्तम आणि साकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि बुध ग्रहाच्या गोचरचा तूळ राशीवर कसा सकारात्मक परिणाम होणार आहे.
जेव्हा सूर्य आणि बुध एकाच राशीत असतात तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. अशा स्थितीत ऑक्टोबरमध्ये सूर्य आणि बुध तूळ राशीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे या राशीमध्ये या शुभ योगाचा संयोग होणार आहे. बुधादित्य योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. यावेळीही तूळ राशीला विशेष लाभ मिळू शकणार आहेत.
तूळ राशीत बुध संक्रमण सर्व क्षेत्रांमध्ये लाभ देणार आहे. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. बुध ग्रहाच्या कृपेने नोकरीच्या नवीन संधी मिळतील. काम चांगले होणार आहे. हे गोचर तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.
सूर्याच्या गोचरमुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत समाधान मिळेल. सूर्य गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फारसं लाभदायक नसणार आहे. या काळात ऑफिसच्या कामामुळे तुमचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करणे कठीण होऊ शकते. या काळात गुंतवणूक करणे टाळावं.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )