Baba Vanga यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर...

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. अजूनही या युद्धाला विराम लागलेला नाही. अश्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य जमा करण्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Sep 28, 2022, 02:52 PM IST
Baba Vanga यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर... title=

Baba Vanga Prediction for Russia: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. अजूनही या युद्धाला विराम लागलेला नाही. अश्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य जमा करण्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुतिन (Vladimir Putin) यांच्या घोषणेनंतर लोकं रशिया सोडण्याचा प्रयत्नात आहेत. यानंतर बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी रशिया आणि पुतिन यांच्याबाबत केलेल्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या भविष्यवाणीनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनणार आहेत आणि रशिया जगावर राज्य करेल. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी रशियाबाबत भाकीत केले होते की, रशिया ही जगातील एकमेव महासत्ता असेल. अण्वस्त्रांचा वापर आणि तिसर्‍या महायुद्धाबाबतही त्यांनी भाकीत केले.

बाबा वेंगा यांनी भाकित वर्तवलं होतं की, 'सर्व बर्फासारखे वितळेल, परंतु एकच गोष्ट अस्पर्शित राहील आणि ती म्हणजे 'व्लादिमीरचा अभिमान', 'रशियाचा अभिमान'. यात अनेक लोक बळी पडतील, परंतु रशियाला कोणीही रोखू शकत नाही. त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला दूर केलं जाईल. कोणीही रशियाला अडवू शकणार नाही. रशिया जगावर राज्य करेल.'

Rashi 2022: ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह बदलणार राशी, या राशींना मिळतील अशी फळं

बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 मध्ये झाला होता. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी एका अपघातात तिला दोन्ही डोळे गमवावे लागले. ती तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हती. परंतु तिच्याकडे भविष्याबाबत जाणण्याची एक विशेष शक्ती होती, असं बोललं जातं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)