Astro tips for shoes : चुकूनंही 'या' रंगाचे शूज पायात घालू नका; दुर्देव पाठ सोडणार नाही!

ही एक चूक माणसाला गरिबीच्या मार्गावर ढकलू शकते.

Updated: Jul 8, 2022, 11:00 AM IST
Astro tips for shoes : चुकूनंही 'या' रंगाचे शूज पायात घालू नका; दुर्देव पाठ सोडणार नाही! title=

मुंबई : फॅशनच्या नव्या युगात लोकांच्या शुजचे रंग झपाट्याने बदलत आहेत. आजकाल तरूणाई पेहरावानुसार शूज आणि चप्पलचा रंग ठरवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, कलरफुल शूज आणि चप्पल निवडताना आपण अनेकदा मोठी चूक करतो. ही एक चूक माणसाला गरिबीच्या मार्गावर ढकलू शकते.

ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, चप्पल खरेदी करताना बहुतेक लोकं फक्त स्टाइलकडेच लक्ष देतात. किंवा फक्त त्यांच्या पायात कोणते शूज आणि चप्पल अधिक सुंदर दिसत आहेत ते पाहतात. या दरम्यान ते अशी चूक करतात ज्यामुळे आनंद, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, मुलं आणि विवाहाचा कारक गुरु ग्रह क्रोधित होऊ शकतो.

चुकूनंही पिवळ्या रंगाचे शूज किंवा चप्पल घालू नये. मुळात पिवळा रंग हा गुरूचा रंग मानला जातो. ज्योतिषी सांगतात की, पिवळ्या रंगाचे शूज आणि चप्पल परिधान केल्याने कुंडलीत बृहस्पति कमजोर होतो. यामुळे तुमचं कौटुंबिक जीवन विस्कळीत होऊ शकतं. घराच्या सुख-समृद्धीवर याचा अशुभ प्रभाव पडतो.

कोणत्या रंगाचे शूज घालावेत?

ज्योतिषी सांगतात की, तुम्ही काळ्या, निळ्या, तपकिरी किंवा पांढर्‍या रंगाचे शूज घालू शकता. जर तुम्हाला स्टाइल किंवा फॅशनमध्ये तडजोड करायची नसेल तर तुम्ही लाल रंगाचे शूजही घालू शकता. पण पिवळ्या रंगाचे शूज आणि चप्पल घालणं शक्यतो टाळावं.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)