Sankashti chaturthi 2024 date : संकष्टी चतुर्थी हा गणपतीचा दिवस आहे. असे मानले जाते की, या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व दु:ख आणि समस्या दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते. पण यंदाची संकष्टी चतुर्थी ही 2024 या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे. या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी किंवा अखुरथ संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर रोजी येत आहे. पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:06 वाजता सुरू होईल आणि 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:02 वाजता समाप्त होईल.
संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या दिवशी केलेली चूकी बाप्पाला नाराज करु शकते. अशावेळी विशेष काळजी करणे गरजेची असते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.
या दिवशी कुटुंबातील कोणीही मद्यपान करू नये. त्यामुळे पूजेचा पूर्ण लाभ भक्ताला मिळत नाही. त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करू नयेत. याशिवाय संकष्टीच्या व्रतामध्ये काळे कपडे घालू नये तर पिवळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करावी. या दिवशी तुम्ही उपवास केला नसला तरीही सात्विक अन्नच सेवन करा. पूजेच्या ठिकाणी श्रीगणेशाची मूर्ती किंवा चित्र पीठावर ठेवा. शक्य असल्यास, मातीची किंवा पितळेची मूर्ती वापरा.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाची पूजा करावी. गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत. या दोन्ही गोष्टी विघ्नहर्ताला अत्यंत प्रिय आहेत. याशिवाय उपवास करणाऱ्यांनी उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा आणि सूर्यास्तानंतर पारण करावे. या दिवशी तुम्ही सतत भजन कीर्तन करून श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळवू शकता.
अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. श्रीगणेशाला विघ्नहर्ता म्हणतात, या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि संकटे दूर होतात असे मानले जाते. गणेशजी हे बुद्धिमत्तेचे देवता आहेत, त्यांची या दिवशी पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञान वाढते.
या दिवशी गणपतीला जी काही इच्छा मागितली जाते ती नक्कीच पूर्ण होते असा विश्वास आहे. श्रीगणेशाच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते. पैसा मिळतो आणि व्यवसाय वाढतो. अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वादही मिळतो.