Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार 'अग्नि पंचक'! चुकूनही या बाबी करू नका

Panchak in November 2022: नोव्हेंबर महिन्यात पंचक लागण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नोव्हेंबर महिन्यात अग्नि पंचक असणार आहे. या काळात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा नुकसान होऊ शकतं.

Updated: Nov 25, 2022, 01:07 PM IST
Panchak 2022: नोव्हेंबर महिन्याच्या या दिवसापासून लागणार 'अग्नि पंचक'! चुकूनही या बाबी करू नका title=

Panchak in November December 2022: हिंदू धर्मशास्त्रात ग्रहस्थिती, पंचक आणि योग याबाबत सांगितलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात पंचक असतं. पंचक काळात शुभ कार्य करू नये, असं सांगितलं जातं. काही पंचक काळात तर शुभ कार्य करूच नका, असा सल्ला दिला जातो. पंचक कालावधी पाच दिवसांसाठी असतो. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पंचक लागेल आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल. पंचक 29 नोव्हेंबरला मंगळवारी सुरु होणार असून 4 डिसेंबरला रविवारी रात्री संपणार आहे.पाच दिवस काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं आहे. अग्नि पंचक (Agni Panchaka) अशुभ (Unauspicious) असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे पंचक सुरु होण्यापूर्वी काय करावं आणि काय करून नये, याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. कारण पंचक कालावधीत केलेल्या कामामुळे आयुष्यभरासाठी फटका बसू शकतो. चला जाणून घेऊयात या काळात कोणती कार्य करु नयेत

अग्नि पंचक काळात ही कार्य करु नका

-अग्नि पंचक काळात आग लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आगीशी निगडीत काम असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. खासकरून पंचक काळात मशिन, हत्यार आणि निर्माणाधीन वस्तू खरेदी करू नयेत.

-पंचक काळात लाकूड, फर्निचर, पलंग आणि इंधन खरेदी करू नये.

-घरावरील छत किंवा घर बांधणं या काळात अशुभ असतं. त्यामुळे या काळात घर बांधणी करू नये. 

-पंचक कालावधीत दक्षिणेकडे प्रवास करणं टाळावं. दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. पंचक काळात यात्रा करणं धोक्याचं असतं. 

बातमी वाचा- Vinayak Chaturthi 2022: विनायक चतुर्थीला शुभ योग! जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

-अग्नि पंचक काळात मंगळाशी निगडीत वस्तू काळजीपूर्वक हाताळाव्यात. तसेच कोणावरही राग व्यक्त करू नको. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)