पन्नास वर्षांनंतर मालव्य राजयोगासोबत बनतायत '3' खास राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Shash And Malavya Rajyog: 3 राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 6, 2023, 07:40 AM IST
पन्नास वर्षांनंतर मालव्य राजयोगासोबत बनतायत '3' खास राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस title=

Shash And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळाने त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी अनेकदा शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. या योगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. या डिसेंबरमध्ये 3 राजयोग तयार झाले आहेत. 

यावेळी राजयोग मंगळ आणि शनिदेवाने निर्माण केला आहे. मंगळाने एक रूचक राजयोग तयार केला आहे. तर दुसरीकडे शनिदेवाने शश राजयोग निर्माण केला आहे, तर शुक्राने मालव्य राजयोग निर्माण केला आहे. या 3 राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

तूळ रास (Tula Zodiac)

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसेही मिळू शकणार आहेत. तुम्हाला तुमच्या भाग्याचा लाभ मिळणार आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत.

मकर रास (Makar Zodiac)

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी करिअरमध्ये यश मिळू शकते. योजना यशस्वी होतील. कामात गती आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. 

कुंभ रास (Kumbh Zodiac)

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही करत असलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम वाढतील. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आहे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. 3 राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )