Kendra Trikon Rajyoga 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. शनिदेव सर्वात संथ गतीने म्हणजे तब्बल अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. अशा स्थितीत शनिदेवाला एका राशीत पुन्हा येण्यासाठी तब्बल 30 वर्षे लागतात. शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी म्हणजे स्वगृही कुंभ राशीत सध्या विराजमान आहे. यावेळी शनी देव शश राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करणार आहे.
वैदिक ज्योतिष्य शास्त्रात कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानला जातो. हा राजयोग 2024 या वर्षात काही राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. पुढील वर्षी काही राशींना केंद्र त्रिकोण राजयोगाचा बंपर लाभ होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप चांगला सिद्ध होणार आहे. त्याच्या शुभ प्रभावामुळे 2024 मध्ये मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ पूर्णपणे मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप आनंदच आनंद असणार आहे. 2024 मध्ये तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे.
या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे बरेच फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यवसायात खूप वाढ होणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळू देणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार आहे. पुढील वर्षी मिथुन राशीच्या लोकांनाही अडकलेले पैसे परत मिळणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे होणार आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळणारा आहे. शनीच्या कृपेने पुढील वर्षी तुमचं नशीब उजळणार आहे.
या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोगातून भरपूर लाभ होणार आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप यश घेऊन येणार आहे. पूर्वीच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. या राशीचे लोक सहलीचे बेत आखणार आहे. केंद्र त्रिकोण राजयोगाच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना 2024 मध्ये आर्थिक फायदा होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही खूप प्रगती होणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )