Chaturth Dasham Yog :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती बदलत असतात. सध्या ग्रहांचा राजा आणि शनिदेवाचे पिता सूर्यदेव पुत्र शनिच्या घरात मकर राशीत एक महिन्यासाठी विराजमान आहे. तर चंद्र हा मीन राशीत आहेत. अशा स्थितीत ग्रहांची दशा पाहिल्यास सूर्य आणि गुरु एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात असल्याने सूर्य आणि गुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग तब्बल 10 वर्षांनी जुळून आला आहे. या चतुर्थ दशम योगाचा प्रभाव 12 राशींवर पडल्या असून त्यातील 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. (After 10 years Chaturth Dasham Yog Sudden financial gains for these zodiac sign)
चतुर्थ दशम योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. कामं मार्गी लागणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. नफा मिळविण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला चांगले यश प्राप्त होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती होणार आहे. तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेणार आहात. तुमची कार्यशैली सुधारणार आहे. तुमचा आत्मविश्वासही दुप्पटीने वाढणार आहे. ज्यांचं लग्न झाले आहे त्यांचे वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे.
चतुर्थ दशम योग तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. याशिवाय गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तर जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळणार आहे. दुसरीकडे, तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे.
चतुर्थ दशम योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश प्राप्त होणार आहे. तसंच, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असाल तर पुढे नेण्यास सक्षम असणार आहात. भागीदारीत व्यवसाय करणार्यांचा त्यांच्या भागीदारांशी चांगला समन्वय होणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच यावेळी नशीबही तुमची साथ देणार आहे. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)