Dhan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शनिदेव हा कर्माचा दाता सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तर चंद्र हा सर्वात गतीने आपलं स्थान बदलतो. शनिदेवाला अडीच वर्ष लागतात तर चंद्राला अडीच दिवस लागतो. 11 डिसेंबरला चंद्रदेवाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीत आधीपासून मंगळ आणि सूर्य विराजमान आहे. अशा स्थितीत चंद्र गोचरमुळे वृश्चिक राशीत त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या त्रिग्रही योगात चंद्र आणि मंगळ युतीमुळे काही राशींच्या कुंडलीत धन राजयोग निर्माण होणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार असून कोण आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊयात. (After 1 year Dhan Rajyog from Moon and Mars conjunction chandrama and mangal Sudden financial gains for 3 zodiac signs)
मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत धन राजयोग निर्माण होणार असून त्यांच्यासाठी तो शुभ ठरणार आहे. तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला या काळात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी या राजयोगामुळे दूर होणार आहे. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करणार आहात. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. व्यावसायिकांना अधिक नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशनची संधी आहे.
मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीतही धन राजयोग निर्माण झाल्यामुळे तुमच्या उत्पन्नात घशघशीत वाढ होणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदच आनंद असणार आहे. या काळात धैर्य आणि शौर्य तुमच्यामध्ये अधिक प्रबळ होणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. पालकांचं सहकार्य तुम्हाला ऊर्जा देणार आहे. नवीन व्यवसाय तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कामातून तुम्ही कनिष्ठ आणि वरिष्ठ सहकार्यांची मनं जिंकणार आहात. मुलांकडून तुम्हाला आनंदी बातमी मिळणार आहे.
धन राजयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे. तुमची प्रतिकारशक्ती चांगली होणार असून दीर्घ आजारातून तुम्ही मुक्त होणार आहात. व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठीही आपण नियोजन करु शकणार आहात. चांगलं उत्पन्नासोबत तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुमच्या मनोकामना या राजयोगामुळे पूर्ण होणार आहे. या काळात तुम्हाला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागणार आहे. या प्रवासातून तुम्हाला फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)