मुंबई : यश, अपयश येत जात राहतात. काहींच्या वाट्याला सतत यश येत राहत, तर काहींच्या नशिबी मात्र फक्त अपयश असतं. प्रचंड मेहनत करुन देखील सतत वाट्याला अपयश येत असेल, तर कोणीही निराश होईल. चाणक्यानुसार जो कोणी महत्त्वाच्या 4 गोष्टींचे पालन करतो, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजही चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी लोकांना ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करतात. चाणाक्यांनी सांगितलेल्या चार शिकवणीबद्दल जाणून घेऊ...
सिंहाप्रमाणे लक्ष्यावर लक्ष ठेवा
आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने सिंहाप्रमाणे आपल्या लक्ष्यावर लक्ष ठेवले पाहिजे, ज्याप्रमाणे सिंह आपल्या शिकारीवर लक्ष ठेवतो आणि संधी मिळताच शिकार करतो. त्याचप्रमाणे आयुष्यात येणार्या संधी कधीही सोडू नयेत.
पूर्ण लक्ष ध्येयावर ठेवले पाहिजे
आचार्य चाणक्य यांच्या मते, यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने आपले पूर्ण लक्ष ध्येयावर ठेवले पाहिजे, तरच तो यशस्वी होऊ शकतो. ध्येयाबाबत भ्रमनिरास झाला तर संधी वाया जाईल, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक आहे.
इच्छाशक्ती आणि मेहनत
आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रामाणिकपणाने केलेले परिश्रम ध्येय साध्य करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. काम लहान असो वा मोठे, पूर्ण इच्छाशक्ती आणि मेहनतीने पूर्ण केले पाहिजे.
हिंमत आणि धीर
आचार्यांच्या मते माणसाला आपले ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करावे लागतात. या दरम्यान, काहीवेळा एखादी व्यक्ती अपयशामुळे किंवा इतर कारणांमुळे हिंमत गमावते, परंतु कधीही धैर्य गमावू नये. व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण शक्ती लावली पाहिजे.