Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Rajyoga :  कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Nov 26, 2023, 06:25 PM IST
Rajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी title=
3 Rare Rajyogas graced by Shani Mercury Change the fortunes of these signs with wealth

Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. म्हणजे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या ग्रहांच्या राशी बदलाला गोचर असं म्हटलं जातं. ग्रहाचं गोचर हे मानवी जीवनावर परिणाम करतं. या ग्रहांच्या संक्रमणातून कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह सध्या वृश्चिक राशीत आहे. मंगळामुळे रुचक योग तयार झाला आहे. तर शनिदेव स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. तब्बल 30  वर्षांनी शश राजयोगाची निमिर्ती झाली आहे. तर ग्रहांचा राजकुमार बुधदेवामुळे महाधन राजयोग तयार झाला आहे. या तीन राजयोगामुळे तीन राशींच्या लोकांना छप्पडफाड पैसा मिळणार आहे. (3 Rare Rajyogas graced by Shani Mercury Change the fortunes of  these signs with wealth)

मेष रास (Aries Zodiac) 

तीन राजयोग हे या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या संपत्ती द्विगुणीत वाढ होणार आहे. या काळात सर्व रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. हे राजयोग तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर ठरणार आहे. नवीन कामातून तुम्हाला नफा मिळणार आहे. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

या राशींच्या लोकांसाठी 3 राजयोग वरदान ठरणार आबहे. नोकरदारांना आर्थिक फायदा होणार आहे. त्यांच्या कामाची नवीन जबाबदारी वाढणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे लाभणार आहे. तुमची परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. या तीन राजयोगामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. अगदी भौतिक सुखात वाढ होणार आहे.  

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना तीन राजयोग खूप शुभ सिद्ध होणार आहे. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होणार असल्याने तुम्ही टेन्शनमुक्त होणार आहात. या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आता मिळणार आहे. कमाईचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)