मुंबई : लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की लग्नानंतरचे पहिले वर्ष फार कठीण असते. अनेकांना हा हनीमून पीरियड वाटतो तर काहींसाठी हा काळ म्हणजे जोडीदाराला समजून घेण्याचा काळ असतो. जाणून घ्या लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणत्या समस्या येतात...
लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा तिच्यासाठी हे घर नवीन असते. सासरीही मुलीच्या रुपात नव्या पाहुण्याचे आगमन होते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो अशात मुलीला नव्या घरात अॅडजस्ट होण्यासाठी वेळ लागतो.
लग्नाआधी मुलगा आणि मुलीच्या मनात विविध जिज्ञासा असतात. वेळेप्रमाणे हकीकत बदलते आणि लग्न ही जबाबदारी असल्याचे भान येते.
लग्नाआधी मुलीची लाईफस्टाईल वेगळी असते. आईच्या घरी असताना मुली बिनधास्त असतात. मात्र लग्नानंतर लाईफस्टाईल बदलते. मनमौजी स्वभावाला तुम्हाला आळा घालावा लागतो.
लग्नानंतर काम करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर एखादी मुलगी आई-वडिलांच्या घरी काम करत असेल तर तिला सासरी तितकासा त्रास पडत नाही. मात्र कामाची सवय नसेल तर मात्र मुलीला सुरुवातीला त्रास होतो.