I Love You न म्हणता 'या' 3 गोष्टींद्वारे तुमच्या Crush चे मन जिंकू शकता!

Love Advice : I Love You असे म्हणण्याव्यतिरिक्त आपल्या हृदयातली भावना आपल्या क्रशला सांगण्याचे बरेच मार्ग आहेत. फक्त हे तीन शब्द चालणार नाहीत. क्रशला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला अजून बरेच काही करावे लागेल.... 

Updated: Sep 23, 2022, 02:03 PM IST
I Love You  न म्हणता 'या' 3 गोष्टींद्वारे तुमच्या Crush चे मन जिंकू शकता! title=

How to Impress Your Crush : आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी आपल्याला मनापासून हवी असते. पण संकोचामुळे आपण आपल्या मनातल बोलण्यास टाळाटाळ करतो. नेहमी एकाच व्यक्तिचा विचार मनामध्ये येत असतो. त्याच व्यक्तीच्या विचारामध्ये आपण हरवून जातो... आपल्यापैकी बरेच जण आपल्या क्रशचे मन कसे जिंकायचे याबद्दल चिंतेत असतात, त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही, आपण काही पद्धती वापरून पाहू शकता.

 
1. मैत्रीपासून सुरूवात करा

तुम्ही एखाद्याला तुमचा प्रियकर तेव्हाच बनवू शकता, जोपर्यंत तुम्ही त्याचा चांगला मित्र-मैत्रीण होत नाही. कारण बहुतेकदा प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते. जोपर्यंत तुम्ही कोणाचा चांगला मित्र होत नाही तोपर्यंत त्याला प्रियकर बनवणे कठीण असते. त्यामुळे सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे मैत्रिचा हात पुढे करा. तुम्ही मुलगा आहात की मुलगी असा विचार करू नका. कारण मैत्री नात्याची सुरूवात कोणीही कधीही करू शकता. तसेत आधी तू, आधी तू करण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. 

 

2. तुमच्या जीवनातील त्यांचे महत्त्व स्पष्ट करा
जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे सांगण्यास अजिबात संकोच करू नका. तसेच तुम्ही त्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली पाहिजे. तुम्हालाही तुमच्या कृतीतून हे महत्त्व जाणवू शकते. तुम्ही त्यांची काळजी घ्या, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करा. जर तुम्ही हे सतत करत असाल तर त्यांच्या हृदयालाही तुमच्याबद्दलची प्रेमाची भावना येण्यास सुरूवात होईल. 

 वाचा : Surya Grahan 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहणाचे सावट, लक्ष्मीपूजन कधी करावे?, अधिक वाचा

3. खोट कधीही बोलू नका
त्यांचे मन जिंकण्यासाठी तुम्हाला कितीही दिवस थांबावे लागले तरी चालेल. पण कोणत्या गोष्टीचा देखावा करू नका. कारण खोट्याचा आधार घेतला तर एक दिवस सत्य बाहेर येईलच. म्हणून प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक रहा, कदाचित त्यांना तुमचे सत्य आवडेल आणि ते तुम्हाला स्वीकारण्यास देखील सहमत होतील.