या ५ सवयींमुळे तुटतात नाती

नाते हे नेहमी प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते. नात्याची गरज समजून त्याप्रती आपली जबाबदारी सांभाळणे हे प्रत्येक पार्टनरचे कर्तव्य असते. मात्र अनेकदा पार्टनरच्या काही सवयींमुळे नात्यात कटुता येऊ शकते. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Mar 9, 2018, 11:59 AM IST
या ५ सवयींमुळे तुटतात नाती  title=

मुंबई : नाते हे नेहमी प्रेम, विश्वास आणि सन्मानावर टिकते. नात्याची गरज समजून त्याप्रती आपली जबाबदारी सांभाळणे हे प्रत्येक पार्टनरचे कर्तव्य असते. मात्र अनेकदा पार्टनरच्या काही सवयींमुळे नात्यात कटुता येऊ शकते. 

जिथे प्रेम असते तिथे लहानसहान भांडणेही आलीच. जर तुमच्या नात्यात कटुता आली असेल तर दोघांनी एकमेकांशी बोलणे गरजेचे असते. बोलूनच समस्या सुटतात. गोष्टी मनात ठेवल्यास त्रास होतो. 

जोडीदारासोबत लहानसहान वाद झाला तर जुन्या गोष्टींवरुन त्याला टोमणे मारु नका. ज्या गोष्टी घडून गेल्यात त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जे घडणार आहे त्यावर लक्ष द्या. कोणताही जोडीदार हा चांगला-वाईट नसतो. त्यांच्या सवयी चुकीच्या असू शकतात. दोघांमध्ये प्रेम असेल तर सवयी बदलल्या जाऊ शकतात. 

पार्टनरसोबतचे तुमचे नाते व्यक्तिगत असते. ते कोणासोबतही शेअर करु नका. अनेकदा जोडीदाराशी भांडण झाल्यास आपण ती गोष्ट मित्रांना सांगतो. य़ामुळे नात्यात कटुता येऊ शकते. यासाठी आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर करु नये. 

तुलना कोणालाच आवडत नाही. अनेकदा आपण आपल्या पार्टनरची तुलना इतरांशी करतो. जे अजिबात योग्य नाहीय. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि नात्यात थोडीफार अॅडजस्टमेंट करावीच लागते. 

नात्यात अनेकदा एखाद्या पार्टनरचा स्वभाव बॉसी होतो जो योग्य नव्हे. याशिवाय प्रत्येक बाबतीत टोचून बोलणे, सतत सल्ले देणेही योग्य नाही. जोडीदाराचीही स्वत:ची पर्सनल लाईफ आहे ज्याचा सन्मान केला गेला पाहिजे.