मुंबई : मुंबई ते पुणे प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे.मुंबईतून शिवडी-न्हावाशेवा सी लिंकवरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई-पोरबंदर प्रकल्प म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सी लिंक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय MMRDA ने घेतला आहे.
मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या रेल्वे आणि रस्ते मार्गाने नागरिकांना प्रवास करता येतो. मुंबई - पुणे प्रवास वेगवान व्हावा यासाठी द्रुतगती मार्गाचा अनेक प्रवासी वापर करतात. या प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे.
मुंबई ते पोरबंदर प्रकल्प म्हणजेच शिवडी न्हावाशेवा या सागरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग सीलिंकला जोडल्यास या प्रवासाचा वेळ आणखी कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे पुण्याहून येणारी वाहने थेट दक्षिण मुंबईत जाऊ शकतील.