Pune Big Updates: ऐन गणेशोत्सवात पुण्यात सीएनजी महाग झाला आहे.पुणे जिल्ह्यात क्षयरोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी18 वर्षांवरील नागरिकांना आता बीसीजीची लस देण्यात येणार आहे.पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. पुण्यातील 10 मोठ्या अपडेट्स जाणून घेऊया.
ऐन गणेशोत्सवात सीएनजी महाग झाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड सह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात रविवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली. त्यामुळे सीएनजीचा दर आता प्रति किलो 85.90 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली.मात्र ही वाढ स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे .सीएनजी दरात 90 पैसे प्रति किलो वाढ झाली आहे
पुणे जिल्ह्यात क्षयरोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी 18 वर्षांवरील नागरिकांना आता बीसीजीची लस देण्यात येणार आहे.क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बीसीजी जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. मात्र आता नागरिकांमध्ये टीबीचा धोका वाढत चालल्यामुळे आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.आशा सेविकांमार्फत केलेल्या सर्वे क्षणात एकूण 7 लाख 50 हजार 704 जणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 लाख 32 हजार 232 जणांना लस घेण्यासाठी संमती दिली आहे
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून 40 लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले.कोंढव्यातून समीर शरीफ शेख याला अटक करण्यात आलीय. पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून 40 लाख रुपयांचे 202 ग्रॅम मेफेड्रोन, देशी बनावटीचे पिस्तूल, मोबाइल संच असा 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुदतपूर्व बदली झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये धाव घेतली. त्यांच्या अर्जाची तातडीने सुनावणी होऊन बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. या आदेशानंतर पुढील सुनावणी होईपर्यंत पंकज देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत.पंकज देशमुख यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून (सीआयडी) 31 जानेवारी 2024 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली केली होती.
शेतकऱ्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत थकविल्यामुळे साखर आयुक्तालयाने 11 कारखान्यांना आरआरसी नोटीस देण्यात आल्यात.नोटिसा बजाविल्यानंतर सहा कारखान्यांनी तातडीने एफआरपी दिली आहे. तरीही अद्याप पाच कारखान्यांकडे 3716.11 लाख रुपये थकीत आहेत.11कारखान्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या सात आहे.
पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसेच पिस्तूल पुरविल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.संगम संपत वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे.आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आंदेकर यांच्या बहिणीलाही अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.खून प्रकरणाचा पुणे गुन्हे शाखेकडून सखोल तपास करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांनी 7 पिस्तुलांसह 23 जिवंत काडतुसे जप्त करून 7 गुन्हेगारांनाही अटक केली.पुण्यातील एन्जॉय ग्रुपच्या गुन्हेगारांच्या मुसक्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या.आरोपींनी कोलवडीतील प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.त्यानंतर या प्रकरणाचा अतिशय वेगाने तपास करत लोणीकंद पोलिसांनी एन्जॉय ग्रुप मधील 7 सात जणांना अटक केली आहे.
वडगाव शेरी चे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचा जाहीर केले आहे.तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गणपती मंडळाच्या आरतीला गेले असताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला.2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील काही महिन्यांपासून ते भाजपपासून पासून दूर आहेत. पठारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका बसणार आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणपती मंडळात जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गणपती मंडळांच्या घेणार भेटीगाठी घेत आहेत. जयंत पाटलांकडून आगामी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराविरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास कार्यकर्त्यांनी काळे फासले. विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या. महायुती धर्म फक्त भाजपने पाळायचा का? असा संतप्त सवाल शिवराज घुलेंनी विचारला. हडपसरमध्ये विकासकामाचे श्रेय लाटताना भाजपला डावलल्याचे सांगत राष्ट्रवादी आमदार विरोधात भाजपने निदर्शने केली.