गिरीश बापट यांची तुफान फटकेबाजी; शरद पवारांसमोर अंकूश काकडे यांना कोपरखळ्या

पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat)  यांनी राष्ट्रवादीचे नेता अंकूश काकडे (Akush Kakade ) यांना कोपरखळी लगावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच लगावण्यात आलीय

Updated: May 9, 2022, 01:17 PM IST
गिरीश बापट यांची तुफान फटकेबाजी; शरद पवारांसमोर अंकूश काकडे यांना कोपरखळ्या title=

 पुणे: पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat)  यांनी राष्ट्रवादीचे नेता अंकूश काकडे (Akush Kakade ) यांना कोपरखळी लगावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच लगावण्यात आलीय.

मागच्या काही महिन्यांपासून विधान परिषदेच्या जागा रखडल्या आहेत. हाच धागा पकडून गिरीश बाबट यांनी अंकूश काकडेंना  'जोर का झटका धीरेसे' दिला. काकडे यांना उद्देशून गिरीश बाबट शरद पवार यांना म्हणाले की, 
"काकडे यांना काहीही द्या, फक्त कोश्यारी राज्यपाल असेपर्यंत विधान परिषद देऊ नका" असं वाक्य उच्चारताच बालगंधर्व रंगमंदिरात एकच हाशा पिकला.

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी लिहिलेल्या 'हॅशटॅग पुणे'  या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या कार्यक्रमाला खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavhan) , माजी आमदार उल्हार पवार(Ulhas Pawar) , इत्यादी मान्यवर उपस्थित होते . उपस्थित सर्वच मान्यवरांनी राजकारणाच्या पलिकडे मात्र राजकीय बाजून मैत्रीपूर्ण फटकेबाजी केली. शरद पवार यांनी सुद्धा आपल्या भाषणा दरम्यान अनेक आठवणींना उजाळा दिला. 

गिरीश बापट यांची फटकेबाजी

मुळात भाषणाच्या सुरुवातीलाच बापट यांनी अंकूश काकडे यांचा उल्लेख पोपट केला. यावरुन बालगंधर्व रंगमंदिरात जोरदार हशा रंगला. माझा मित्र गोडगोड बोलतो असं असा उल्लेख देखील बापट यांनी केला. जसं जसं भाषण वाढत गेलं तसं तसा भाषणाला रंग चढत गेला. याच भाषणादरम्यान बापट यांनी राजकीय फटकेबाजी देखील केली. शरद पवार यांच्याकडे पाहात त्यांनी 'मौके  पे चौका' देखील मारला. पवारसाहेब माझ्या मित्राला म्हणजे अंकूश काकडे यांना  काहीही द्या पण फक्त भगतसिंह कोश्यारी असेपर्यंत राज्यपाल विधान परिषद देऊ नका. असा टोला सुद्धा लगावला