WTC Final 2023: "निवृत्त होण्याआधी मला..."; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या आधीच Rohit Sharma चं सूचक विधान

Rohit Sharma on WTC Final 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्याची जोरदार तयारी भारतीय संघाकडून सुरु असतानाच भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारपरिषदेमध्ये निवृत्तीसंदर्भात अप्रत्यक्षपणे विधान केलं आहे. रोहितला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने हे विधान केलं. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात..

| Jun 07, 2023, 11:12 AM IST
1/10

Rohit Sharma On World Test Championship

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध लंडनमधील ओव्हल मैदानावर आज म्हणजेच 7 जून 2023 रोजी भारतीय संघ मैदानात उतरण्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकारपरिषद घेतली.

2/10

पत्रकारपरिषदेमध्ये रोहित शर्माने अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.

Rohit Sharma On World Test Championship

पत्रकारपरिषदेमध्ये रोहित शर्माने अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र त्याने दिलेल्या एका उत्तराने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

3/10

Rohit Sharma On World Test Championship

रोहित शर्माला या पत्रकारपरिषदेमध्ये कर्णधार म्हणून तू आपल्या कारकिर्दीच्या शेवटी संघासाठी काय सोडून जाऊ इच्छितो असा प्रश्न विचारण्यात आला. कर्णधार म्हणून तुला असं काय करायचं आहे की जे कायम लक्षात राहील? या प्रश्नावर रोहितने फारच रंजक उत्तर दिलं.

4/10

Rohit Sharma On World Test Championship

रोहितने या प्रश्नाचं सविस्तरपणे उत्तर दिलं. "भारतीय क्रिकेट संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. मी असो किंवा इतर कोणीही असो त्याच्याकडे याच उद्देशाने नेतृत्व सोपवलं जातं," असं रोहित म्हणाला.

5/10

Rohit Sharma On World Test Championship

"यापूर्वी या पदावर (कर्णधारपदावर) जे होते त्यांचाही असाच प्रयत्न होता की जेवढे जास्त सामने, जेवढ्या जास्त चॅम्पियनशिप जिंकता येतील तेवढ्या जिंकवा. माझ्यासाठीही हे असेच आहे," असं रोहित म्हणाला.

6/10

Rohit Sharma On World Test Championship

"मला सुद्धा कर्णधार म्हणून सामने जिंकायचे आहेत. चॅम्पियनशिप जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही मैदानात उतरतो," असंही रोहितने सांगितलं.

7/10

Rohit Sharma On World Test Championship

"मी कर्णधार असताना काही सीरीज, काही चॅम्पियनशिप जिंकलो तर फार छान होईल. मात्र यासाऱ्याचा विचार करुन आम्ही स्वत:वर फार दबाव आणू इच्छित नाही," असं भारतीय कर्णधाराने स्पष्ट केलं.

8/10

Rohit Sharma On World Test Championship

"एक कर्णधार म्हणून कायमच आपण चॅम्पियनशिप जिंकून द्यावी असं वाटतं. चॅम्पियनशिप जिंकणं हेच या खेळाचं अंतिम ध्येय आहे. त्यामुळेच मी कर्णधार म्हणून निवृत्त होण्याआधी एक किंवा दोन चॅम्पियनशिप जिंकून दिल्या तर फार छान वाटेल. पुढे काय होतंय पाहूयात," असं रोहित म्हणाला.

9/10

Rohit Sharma On World Test Championship

"पुढचे 5 दिवस (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) फार आव्हानात्मक असणार आहेत. आमचं पूर्ण लक्ष चॅम्पियनशिप जिंकण्यावर आहे. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही वर्चस्व निर्माण करावं असं आमचा उद्देश आहे," असंही रोहितने सांगितलं.

10/10

Rohit Sharma On World Test Championship

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. मागील पर्वामध्येही भारताने या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. मात्र त्यावेळेस न्यूझीलंडच्या संघाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळेच यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.